*ठाण्यात नाभिक समजाचा एल्गार...**यापुढे सलून व्यवसायिकांवरील हल्ले अथवा अत्याचार खपवून घेतले जाणार नाही...*
प्रतिनिधी : संजय पंडित
सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृह येथे सलून ब्युटीपार्लर असोसियेशनच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमान्यनगर येथील सलून व्यवसायिक मनीष शर्मा यांच्या आत्महत्या निषेधार्थ हे आंदोलन होते.
लोकमान्यनगर येथील सलून व्यवसायिक मनीष शर्मा यांनी सोमवार दिनांक ३१ जानेवारी रोजी स्थानिक खंडणीखोर गुंडांच्या वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून निराशेतून सलून दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या दुर्दैवी घटनेच्या विरोधात ठाणे,मुंबई,पालघर,पुणे या विभागातील नाभिक बांधव आणि सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते
सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रभारी आणि विख्यात केश रचनाकार उदयजी टक्के, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण,अध्यक्ष दीपक यादव,जनसेवा पक्षाचे महावीर गाडेकर,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अरुण जाधव,संत सेना पुरोगामी संघाचे सचिन कुटे तथा न्यू सलून ब्युटी पार्लर असोसियेशनचे विलासराव साळुंखे आदी मान्यवरांनी यावेळी सलून व्यवसायिकांना मार्गदर्शन करतानाच यापुढे सलून ब्युटीपार्लर व्यवसायिकांनी कधीही स्वतःला एकटे समजू नये असे सांगितले.सर्व संघटना व्यवसायिकांच्या रक्षणासाठी काम करीत आहेत.संकटकाळात सलून असोसियेशन नेहमीच सदैव तत्पर असेल.
तसेच या पुढे सलून व्यवसायिकांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय अथवा अत्याचार सहन केला जाणार नाही असा इशारा वजा एल्गार सलून ब्युटीपार्लर असोसीयेशनच्या वतीने समाजकंटकांना देण्यात आला.
सरकारनेही अशा घटना घडू नये म्हणून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच दिवंगत मनीष शर्मा यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ मदत करावे असे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.
stay connected