*आष्टी पोलीस निरीक्षकपदी हेमंत कदम*
---------------------------------
संदिप जाधव/आष्टी
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांची परळी येथे बदली झाली असून त्यांच्या जागी बीड येथुन आलेले पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी मंगळवार दि ७ फेब्रुवारी रोजी दुपारी पदभार स्विकारला आहे.
पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी औरंगाबाद येथे सात वर्षे पोलिस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले तसेच परळी येथे तीन वर्षे तसेच बीड येथील पेठ बीड पोलिस ठाण्याचा दोन वर्षे पदभार सांभाळला असून त्यांनी सर्व ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.त्यांनी आष्टी पोलिस ठाण्याचा पदभार मंगळवारी घेतला असून त्यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितले की, सर्व जनतेनी निःसंकोचपणे पोलिस ठाण्यात येऊन आपल्या समस्या मांडाव्यात त्यांच्या जाणून घेऊन न्याय देण्याचे काम सदैव करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
stay connected