डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले,
पुणे प्रतिनिधी - डिजीटल मीडिया ला वार्तांकन पासेस नाकारल्या बाबत निवेदनाद्वारे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य समिती सदस्य शरद लोणकर यांनी मुख्यमंत्रयांना निवेदन दिले असून त्यात असे नमुद करण्यात आले आहे कि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आता डिजिटल भारत सक्षम होत आहे . यापूर्वी सरग नावाचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी पुण्यातील डिजिटल मिडिया ला चांगले उत्तेजन आणि सहकार्य दिले आहे.त्यांच्यानंतर मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असे खेदाने नमूद करीत आहे.
यापूर्वी झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीस डिजिटल मिडिया ला मतदान, मतमोजणी संदर्भात तसेच वेळोवेळी शासकीय स्तरावरून, निवडणूक आयोगाच्या स्तरावरून देण्यात येणारे पासेस देण्यात आलेले आहेत .
यावेळी आता कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होते आहे ,या निवडणुकीतील मतदान,मतमोजणी पासेस साठी जिल्हा माहिती कार्यालयाने फोटो आणि पासेस मागविले होते ,तथापि आज त्यांच्या कार्यालयातून डिजिटल मिडीयाला पासेस नाकारल्याचे सांगण्यात आले आहे .त्यामागे काही कारण सांगण्यात आलेले नाही .
आमची मागणी आहे कि, डिजिटल मिडिया ला आपण अशा प्रकारे अव्हेरू नये. हवे तर आवश्यक ते जरूर निकष लावावेत मात्र डिजिटल मिडिया ला वार्तांकनासाठी सहाय्य करावे .
आशा आहे आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षीत केलेल्या डिजिटल इंडिया मधील डिजिटल मिडिया ला भक्कम करण्यासाठी निराश करणार नाहीत . अशी मागणी निवेदनाद्वारे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य समिती सदस्य शरद लोणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .
stay connected