अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी : युवक काँग्रेस

 अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी : युवक काँग्रेस    




Anil More Reporter kada 

आज कडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले .

केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपती यांच्यावर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा  धोक्यात आणला आहे .अदानी उद्योग समुहामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एल आय सी  सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यावधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले . एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँक ऑफ इंडियाचे 49 कोटी खातेदारांच्या पैसा परत मिळेल का ?अशी भीती निर्माण झाली आहे 

     सर्वसामान्य , मध्यमवर्ग , नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपला मेहनतीचा पैसा  गुंतवला आहे.परंतु मोदी सरकारने  आदानीच्या कंपन्यांमध्ये जबरदस्तीने गुंतवायला भाग पाडले आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांनी मिळून अदानी समूहाला 80 हजार कोटींचे कर्ज दिले आहे .अदानी समूहातील गैरकारभारामुळे 33 हजार कोटींचे नुकसान झाले आहे .

अदानी उद्योगसमूहातील गैरकारभाराची चौकशी  व्हावी तसेच गुंतवणूकदारांना व ठेवीदारांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी युवक काँग्रेसने आंदोलन केलं यावेळी तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे , युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत जाधव , सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडे ,अशरफ सय्यद तालुका अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस ,सचिन अरु , सुधीर भालेकर, अनिकेत महाडिक ,किरण खांडेकर ऋषिकेश जाधव , अनिकेत जाधव , सागर भवर , कल्याण भवर ,परमेश्वर साबळे आदी युवक उपस्तिथ होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.