तालुक्यातील शेतकयांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ द्यावे- रवि (काका) ढोबळे
अनिल मोरे/कडा..
तालुक्यातील महसुल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकयांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असुन शेतकयांना तात्काळ अनुदान वितरीत करा असी मागणी रवि (काका) ढोबळे यांनी आष्टीचे तहसिलदार विनोद गुंडमवर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
सन 2022 मध्ये आष्टी तालुक्यातील सर्व महसुल मंडळात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. महसुल प्रशासनाने फक्त कडा व आष्टी महसुल मंडळासच नुकसान भरपई पोटी 13600 हेक्टरी अनुदान मंजुर केले आहे ते देखील अद्याप शेतकयांना मिळालेले नाही.
तालुक्यात सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकयांच्या पिकांचे पुर्णत: नुकसान झालेले असतांना फक्त कडा व आष्टी या दोन मंडळास 13600 हेक्टरी अनुदान मंजुर केल्याने आष्टी तालुक्यातील इतर उर्वरीत महसुल मंडळातील शेतकयांवर अन्याय झाला आहे. कडा व आष्टी या दोनच मंडळांना अनुदान मंजुर झाले, त्यांच्या याद्या देखील तलाठी, व मंडळ अधिकारी यांनी आष्टी तहसिल कार्यालयात पाठवलेल्या आहेत परंतु अद्याप शेतकयांना अनुदान मिळालेले नाही ते अनुदान तात्काळ देवुन इतर उर्वरीत महसुल मंडळाची फेर चौकशी करुन अनुदान मंजुर करुन तत्काळ वितरीत असी मागणी ढोबळे यांनी केली आहे.
stay connected