शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा नसता आमदार महोदयांचे पेन्शन बंद करा- शिक्षक नेते बा.म.पवार

 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा नसता आमदार महोदयांचे पेन्शन बंद करा- शिक्षक नेते बा.म.पवार 




आष्टी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकारला निवृत्तीवेतन जुनी पेन्शन योजना देण्यासाठी शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत असेल तर मग त्यांनी राज्यातील व देशातील सर्व आमदारांचे वेतन भत्ते व निवृत्तीवेतन हे सर्वच बंद करून टाकावेत जेणेकरून शासनाची विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास मदत होईल असे प्रसिद्ध पत्र शिक्षक संघटनेचे नेते  बा.म.पवार यांनी काढले आहे


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पवार यांनी सांगितले आहे की वयाच्या 58 वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना सरकार नौकर किंवा लोकसेवक म्हणून राब राब राबवून घेतात आणि त्याच्यामुळे बदल्यात त्यांना नियमित पगार आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो परंतु अलीकडच्या काळात सरकारने नवीन नियम आणून पेन्शन योजना गोठवली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहेत काहींना पेन्शन तर काही विना पेन्शनचे सेवानिवृत्त होणार हा दिसणारा नैसर्गिक फरक कर्मचाऱ्यांमध्ये दरी निर्माण करणारा असून सरसकट जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी होत आहे त्या मागणीचा फटका विद्यमान सरकारला शिक्षक मतदार संघात बसला असून अनेक ठिकाणचे पुरस्कृत आमदार पराभूत झाले आहेत आता तरी सरकारने आपले डोळे उघडले पाहिजेत वाडी वस्ती तांड्यावर दुर्गम डोंगरी भागात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या ज्ञानमंदिरातील शिक्षकांना जुनी पेन्शन लागू केली पाहिजे नसतात केवळ जनतेच्या मतदानावर निवडून येणाऱ्या आपल्या आमदारांना पेन्शन देणे हे सुद्धा नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार लागू होत नसल्याचा आरोप होत असल्याने एक तर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा नसता आमदार महोदयांना देण्यात येणारी पेन्शन योजना रद्द करा अशी मागणी होत आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने जुन्या पेन्शन योजनेवर निर्णय घेऊन शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय निर्णय देण्याची मागणी शिक्षक संघटनेचे नेते बा.म.पवार  पवार यांनी केले आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.