डॉ धर्मराज सुरोसे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

 डॉ धर्मराज सुरोसे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती 



अहमदनगर प्रतिनिधी :-  शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा राष्ट्रीय अटल फाउंडेशनचे  महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ.धर्मराज एकनाथ सुरोसे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ.रवींद्रजी भताने यांनी ही माहिती दिली.महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन ,अभियांत्रिकीय ,वैद्यकीय ,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व शाळेमध्ये कार्य करणाऱ्या ग्रंथपालाना तसेच नेट, नेट, पीएचडी ,झालेल्या प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी डॉ. रवींद्रजी भताने सचिव प्रा.ज्ञानेश्वरजी हिलाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाची स्थापना करण्यात आली आहे ." ग्रंथपालाच्या हक्कासाठी आमचा लढा "  हे ब्रीदवाक्य घेऊन संघटनेची वाटचाल सुरू आहे.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या दोन्ही पदाचा शासन निर्णय तात्काळ काढावा. यासाठी शासनाकडे मागणी  करण्यात येणार आहे. ग्रंथपाल पद भरती संदर्भात हा प्रश्न रीतसरपणे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ.सुरोसे यांनी सांगितले.

या निवडीबद्दल मा.नामदार चंद्रकांत दादा पाटील , मा.नामदार राधाकृष्ण  विखे पाटील  , मा.नामदार अतुल सावे ,खा.डॉ.सुजय दादा विखे पाटीलआ. सुधीर तांबे ,आ.वसंत काळे, आ. नागो गाणार, आ कपिल पाटील ,आ. नरेंद्रजी दराडे महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे निवडीबद्दल आ. सुधीर तांबे आ. वसंत काळे ,आ.नागो गाणार  ,आ.कपिल पाटील ,

आ नरेंद्रजी दराडे ,आ.मोनिकाताई राजळे ,आ.रामजी,शिंदे ,आ.बबनरावजी पाचपुते , आ.बाळासाहेब ,थोरात ,आ. संग्राम भैया जगताप ,आ.अरुण काका जगताप आ.निलेश लंके,आ.शंकरराव गडाख महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे ,प्रा. ज्ञानेश्वर हिलाले , गजानन खराटे ,अमोल वर्पे ,प्रा.वैशाली,पानसरे,डॉ.राजकुमार घुले,डॉ.अशोक वैद्य ,डॉ.किरण गुलद्गड ,डॉ. निलिमा थोरात, डॉ. मनीषा जमादार, डॉ.अनिल पाटील,

 डॉ. शैलेश देसाई ,डॉ.लोखंडे ,डॉ.काळे, डॉ.अमोल मोरे आदि 

प्राचार्य, प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. धर्मराज सुरोसे यांचे या नियुक्तिबद्द्ल विशेष अभिनंदन होत आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.