वाघोली ग्रामपंचायतीवर भाजपच्या "वाघेश्वरी" पँनलचाच झेंडा,जनशक्ती-राष्ट्रवादीच्या "ज्ञानेश्वर"पँनलचा दणदणीत पराभव!
संपूर्ण जिल्हाभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीच्या निवडनुकित भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शना खालील व युवा नेते उमेशभाउ भालसिंग यांच्या नेतृत्वाखालील वाघेश्वरी ग्रामविकास पँनलने सर्व जागा जिंकून विजय संपादन केला आहे. विरोधी घुले-काकडे प्रणित जनशक्ती- राष्ट्रवादीच्या ।।"ज्ञानेश्वर"पँनलचा दणदणीत पराभव झाला आहे.वाघेश्वरी पँनलचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे-वार्ड क्र.1)मधून राजेंद्र अशोक जमधडे(369मते), नलाबाई कार्लस आल्हाट(393मते),निर्मला गोरक्षनाथ दातिर(399मते), वार्ड क्र.2)मधून सुखदेव नाथा शेळके(501मते), हिराबाई रावसाहेब शिंगटे(507मते), कल्पना पांडुरंग भालसिंग(481मते),वार्ड क्र.3)मधून मोहन बाबुराव गवळी(382मते), घनश्याम निव्रुत्ती वांढेकर(425मते),कांताबाई बबन बोरुडे(394मते), आणि लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणूकीत सौ. सुस्मिता उमेश भालसिंग या (1408मते)मिळवून विजयी झालेल्या आहेत.त्यांनी विरोधी ज्ञानेश्वर पँनलच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ,निर्मला प्रकाश वांढेकर (552मते) यांचा दणदणीत पराभव केला आहे. ज्ञानेश्वर पँनलच्या पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे अशोक जमधडे(308), मिराबाई आल्हाट(282),राधा दातीर(276), हरीभाऊ शेळके(150),विमल शिंदे(145),पायल भालसिंग(171), राजेंद्र शिरसाठ(248), आबासाहेब/गणेश भालसिंग(202), दिपमाला काळे(228), याप्रमाणे मते मिळालेली आहेत. सुरुवातीला चुरशिची वाटणारी निवडणूक मतदान निकालानंतर एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. प्रचाराच्या नारळ शुभारंभा नंतर ज्ञानेश्वर पँनलचे अनेक जण नाँटरिचेबल झाले होते. आता तालुक्यातील पुढाऱ्यांच्या नावावर निवडनुका जिंकण्याचे दिवस संपले आहेत हे या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अधिकार न समजलेले काही कर्तृत्वहीन माणसे अती शहाणपणाण आम्हाला विचारून बातम्या प्रसिद्ध करा हे प्रसार माध्यमांना सांगण्यात आघाडीवर होते.वाघेश्वरी पँनलच्या विजयासाठी माजी सरपंच गाडगे,गवळी, वांढेकर, बोरुडे, शेळके, शिंगटे,भालसिंग, जमधडे,आल्हाट, दातीर, शिंदे,जगदाळे या परीवारांनी अतिशय परिश्रम घेतले.निवडणूक निकालानंतर गावातून विजयी उमेदवारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. विजयी उमेदवारांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी फोनवरून अभिनंदन केले आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
stay connected