वंजारवाडी ग्रामपंचायतसाठी झाले ८५.६४ % मतदान !

 वंजारवाडी ग्रामपंचायतसाठी झाले ८५.६४ % मतदान !



धामणगाव, दि. (दादा पवळ):- आष्टी तालुक्यातील अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी  ग्रामपंचायत म्हणून वंजारवाडी ग्रामपंचायत कडे पाहिले जात होते... या ग्रामपंचायत मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्राम समृद्धी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. विरोधकाच्या चारी मुंड्या चित करून सरपंच पदी युवा नेते संजय महाजन यांच्या आई सौ पार्वती अश्रू महाजन यांचा विजय झाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये अखेरच्या क्षणी साठ मताच्या लिडने विजय झाला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये व गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. एका सरपंच पदासह चार उमेदवार निवडून आले. निवडणुकीमध्ये किंग मेकर ची भूमिका बजावलेल्या बोरडवाडी . येथे... आराध्य दैवत गोसावी बाबा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन सर्व बोरडवाडीकरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी शिवनाथ बोराडे. युवराज बोराडे. राहुल बोराडे. उद्धव बेदरे. अविनाश बेदरे. संजय महाजन. जालिंदर महाजन. बाळू महाजन. बाळू बोराडे. दादा बोराडे सह....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.