बेलगावच्या रेणुकाई देवीचा उद्यापासून तीन दिवस यात्राउत्सव

 बेलगावच्या रेणुकाई देवीचा उद्यापासून तीन दिवस यात्राउत्सव

*****************************



****************************

आष्टी ( प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील श्री रेणुकाई देवी यात्रा उत्सवास उद्या बुधवार दि.७ डिसेंबर दत्तजयंतीपासून प्रारंभ होत आहे.हा उत्सव तीन चालतो या यात्रा उत्सवात बुधवारी संध्याकाळी रेणुकाई देवीची पालखी मिरवणूक (छबीना) मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.तसेच गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार आहे. 

         बेलगांव ग्रामस्थ दरवर्षी रेणुकाई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक -भक्त ,मल्ल या भव्य कुस्ती हंगामाला हजेरी लावतात. ग्रामस्थांकडून देवीच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी ही यात्रा भरवली जाते.याञेनिमित्त भाविकभक्तांनी रेणुकादेवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन  सरपंच,उपसरपंच,ट्रस्ट अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य,बेलगाव ग्रामस्थ व रेणुकाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.