श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषि महाविद्यालयात ‘जागतिक मृदा दिन’ साजरा
आष्टी: दि. ०५
अन्न व कृषि संघटना यांच्या निर्देशाने सन २०१४ पासून ०५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे जागतिक मृदा दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत व अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मृद विज्ञानाचे जनक वि. वि. डोकूचैएव यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिकत असणार्या द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थी तसेच आठव्या सात्रातील कृषि घन कचरा व्यवस्थापन या विषयासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. जागतिक मृदा दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयामध्ये मॉडेल तयार करणे, रांगोळी, पोस्टर सादरीकरण, स्लाईड सादरीकरण इ. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रा. एल. एस. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने वरील स्पर्धेचे परीक्षण करून मूल्यमापन केले. स्लाईड सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम कुमारी जी. एस. येवले व द्वितीय कुमारी मोहिनी बाबर, पोस्टर सादरीकरण मध्ये प्रथम कु. एम. व्ही. वानखेडे व द्वितीय डि. व्ही. वारंगुळे, रांगोळी स्पर्धामध्ये प्रथम वाय. व्ही. सुसस्कर व द्वितीय पि. आय. राऊत, मोडल निर्मितीमध्ये प्रथम कु. बि. व्ही. वंजारी. व द्वितीय कुमारी पि. एस. शेळके या विद्यार्थ्यांनी पुरस्कार पटकाविले. या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. मृद विज्ञान व कृषि रसायन विभागाचे प्रा. डॉ. एम. ए. आजबे यानी माती परीक्षण व जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत यांनी कमीत कमी रसायनिक खतांचा वापर कसा करता येईल व सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त कसा करता येईल या कडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन करताना संगितले. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पदवी शिक्षणाचा कालावधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतः भविष्य घडवण्यासाठी अभ्यास शैक्षणिक उपक्रमावर भर द्यावा असे सांगितले. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या शिस्तीचे पालन करावे असे सांगितले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांनी मातीचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल व जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन करताना संगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे मृद विज्ञान व कृषि रसायन विभागाचे प्रमुख प्रा. एस. आर. देसाईपाटिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. एस. एल. बनकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी डॉ. एम. ए. आजबे, कार्यक्रम नियोजन डॉ. एस. एस. भोसले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कुमारी विजया गुंजाळ व रसिका वाघमारे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कु. श्रेयश फडतरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चतुर्थ वर्षातील आठव्या सत्रातील कृषि घन कचरा व्यवस्थापन या विषयासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
stay connected