कडा शहरामध्ये संत नगर येथे गुरुवर्य वै. मदन महाराज बिहाणी यांची 26वी पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार.
कडा/अनिल मोरे.
आष्टी तालुक्यातील कडा संत नगर येथे गुरुवर्य वै मदन महाराज बिहाणी यांची 26 वी पुण्यतिथी दिं-6 डिसेंबर रोजी सप्ताहाला सुरुवात होणार असुन समाप्ती दिं-13 डिसेंबरला होणार आहे.
या सप्ताहाला मोठा सभामंडप उभारण्यात येणार असून रोशनाई केली जाणार आहे.
दिं -6 डिसेंबर ते दिं13 डिसेंबर 2022 या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्यदिव्य आयोजित करण्यात आले आहे.
अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी दिली.
दिं-6 डिसेंबर 2022 रोजी गुरुवर्य वै मदन महाराज बिहाणी यांच्या गावातील मठापासुन भव्य अशी शोभा यात्रा निघेल.
या शोभा यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती ह. भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी केली आहे आठ दिवस चालणारा हा अखंड हरीनाम सप्ताह.या आठ दिवसांत काकडा भजन, पसायदान,गाथाभजन , ज्ञानेश्वरी पारायन, हरीपाठ,हरिकिर्तन,हरिजागर आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहामध्ये रोज 7ते9 या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
6ते13 डिसेंबर या वेळेचे किर्तन कार
6/12/2022 ह.भ.प श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी)
7/12/2022 ,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कराळे ,,(करंजी घाट)
8/12/2022 ह.भ.प. गणेश महाराज पाटील, (पंढरपूर)
9/12/2022ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर)
10/12/2022 ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर)
11/12/2022 ह.भ.प समाधान महाराज भोजेकर (खां जळगाव)
12/12/2022 ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे, (पुणे)
ह.भ.प. मुकुंद महाराज जाडदेवळेकर यांचे हरिकीर्तन होईल.
मंगळवार दिं13 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11ते12 या वेळेत संत मदन महाराज ट्रस्ट चेअध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे किर्तन होणार आहे सर्व वारकरी व कडा शहर पंचक्रोशीतीलयांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी सांगितले आहे.
stay connected