गद्दार अब्दुल सत्तार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून केली एक मुखी मागणी.

 लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील 

*गद्दार अब्दुल सत्तार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून केली एक मुखी मागणी.



निलंगा: संसद रत्न व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या बाबतीत राज्याचे कृषी मंत्री गद्दार अब्दुल सत्तार यांनी दिनांक.7.11.2022. रोजी व दुसरे गद्दार मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांच्या बाबतीत ही नटी असा उल्लेख करून संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी राज्यातील महिलांचा अपमान करून खालच्या थराची भाषा वापरून सबंध महाराष्ट्राचे बदनामी केल्याने या अशा गद्दार मंत्र्याच्या विरोधात निलंगा येथील शिवाजी चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत जोडे मारो आंदोलन करून लाँग मार्च करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडितरावजी धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो लॉन्ग मार्च मोर्चा काढून गद्दारांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना धुमाळ म्हणाली की महाराष्ट्राच्या शिंदे. व देवेंद्र सरकारमधील असलेले गद्दार मंत्री अब्दुल सत्तार. व दुसरे गद्दार मंत्री गुलाबराव पाटील या दोन मंत्र्याची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून पुरोगामी महाराष्ट्राचे जाहीर माफी मागावी अशी एकमुखी मागणी निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली पुढे बोलताना पंडितराव धुमाळ यांनी सांगितले की 50 खोके घेऊन सरकारमध्ये कोणतीही संवेदनशीलता नसलेले मंत्री हे अनेक असून अशा बिनडोक मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंग्यासह जिल्ह्यात त्यांना फिरू देणार नसल्याचे धुमाळ यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले. ईडी सरकारने तात्काळ अशा वाचाळ मंत्र्यांना तंबी देवुन यांचे राजीनामे घ्यावेत अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने गद्दारांना त्यांची जागा दाखवू असा इशारा धुमाळ यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी. अध्यक्ष पंडितराव धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव,युवकचे उल्हास सूर्यवंशी महेश चव्हाण महिलांच्या अध्यक्षा पानफुला पाटिल,महादेवी पाटील,संगीता कदम युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे हसन चाऊस गफ्फारभाई लालटेकडे विधानसभा कार्याध्यक्ष संदीप मोरे किसान भारती चे जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे. विध्यार्थीचे प्रदेश सरचिटणीस राहुल होनमाने,रोहित पाटिल,कोमलताई देशपांडे सुग्रीव सूर्यवंशी धोंडीराम वाघमारे इत्यादी सह अनेकांच्या सह्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्य सरकारला देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.