आ.आजबेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट महाआक्रोश मोर्चा पाटोदा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा नसता खुर्च्या खाली करा -----आ.आजबेचा शिंदे सरकारला इशारा

 आ.आजबेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट महाआक्रोश मोर्चा पाटोदा उपविभागीय कार्यालयावर धडकला
 शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा नसता खुर्च्या खाली करा -----आ.आजबेचा शिंदे सरकारला इशारा












पाटोदा / प्रतिनिधी


आष्टी पाटोदा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा येथे हजारो शेतकरी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा धडकला छत्रपती शिवाजी चौक ते उपविभागीय कार्यालय पर्यंत हा मोर्चा मोठ्या घोषणाने आणि भव्य दिव्य रॅलीने दणाणून निघाला.

आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांवर आलेलं संकट आणि शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणार कोणीच उरलं नाही. या मोर्चादरम्यान दरेकर नानांनी सुद्धा सरकारवर सडकून टीका केली, हे सिंदळ सरकार असून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी, ऑनलाईन असल्या भानगडीत गुंतवून ठेवण्याचे काम करत आहे. अधिकारी मात्र सुस्त अवस्थेत बसले आहेत. तर आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी देखील सरकारच्या अपयशाचा पाढा वाचत म्हणाले आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झाला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात निधी आणून काम केली. 40,45 कोटी रुपयांचे कामे पाटोदा तालुक्यात सुरू आहेत, असे बाळासाहेब आजबेंनी सांगितले या जन विराट आक्रोश मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या मोर्चात आमदार बाळासाहेब आजबे काका, मा.आ.साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, शेकापचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे , मा.जि.प.अध्यक्ष शिवाजीराव राऊत, जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे,परमेश्वर शेळके, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा घुमरे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राख, विठ्ठल आप्पा सानप शेतकरी नेते विष्णुपंत घोलप, काकासाहेब शिंदे, कॉ  महादेव नागरगोजे,संदिप सुंबरे जुबेर चाऊस, सुनील नाथ, अण्णासाहेब चौधरी, एडवोकेट पंढरीनाथ पारखे बाबासाहेब शेंडगे हरिभाऊ दहातोंडे बाबासाहेब बिटे महादेव डोके नवनाथ तांदळे बबन रांजणे दिलीप तांदळे रामभाऊ गोंदकर महादेव महाजन दादासाहेब डोके सुभाष वाळके अर्जुन काकडे बाळासाहेब पिसाळ संतोष काकडे सुधीर जगताप सतीश सोले केशव आजबे विजयसिंह बांगर, विश्वास नागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, नगरसेवक बाबुराव जाधव, नगरसेवक नाजीम शेख, अण्णासाहेब लवांडे, गोवर्धन सानप, मंगेश पवार, मधुकर पवार, युवराज झुनगुरे, संजय पवार, शरद गवळी, नीलाताई पोकळे, मुरली तांबे आदी सह आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून 5 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा एसडिएम कार्यालयावर धडकला. एसडीएम कार्यालयामार्फत सदरील निवेदन शासनास सादर केले.



■ हे तर शिंदळ सरकार - मा.आ.दरेकर नाना


" एक ना धड भाराभर चिंध्या " अशी परिस्थिती भाजप-शिंदे सरकारची असून ई-पीक पाहणी, ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरेकर नानांनी सरकारवर चांगलीच घणाघाती टीका करत समाचार घेतला. हे शिंदळ सरकार शेतकऱ्यांच्या हिताच नाही, आता शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे दरेकर नानांनी मोर्चामध्ये सांगितले.




■ शेतकऱ्यांच्या हिताचे कामे करू फालतू धंदे करणार नाही - आ.बाळासाहेब आजबे


आमदार झाल्यापासून कर यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे कामे केले आहेत पाटोदा तालुक्यात जवळपास 40-45 कोटीची कामे सुरू आहेत विरोधात विरोधकांसारखे आम्ही तलाव बंद करून टँकर सुरू करण्याचे धंदे करणार नाहीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा निर्णय करू असा विरोधकांवर पलटवार आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला.



■ वाचाळवीर अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध


शेतकऱ्यांच्या व्यथांची जाण नसलेला नसलेला. कृषी क्षेत्रातलं काहीच कळत नसलेला, आणि वाचाळवीर अब्दुल सत्तार यांच्या पुतळा जाळून आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. अशा वाचाळवीळ मंत्र्यांना तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करण्यात यावी. अब्दुल सत्तार यांचं करायचं काय ? खाली मुंडक वर पाय! अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.