*केज मध्ये पत्याच्या क्लबवर पोलिसांची धाड: तिरर्ट खेळताना दहा जुगारी ताब्यात.*
केज :- केज येथे एका पत्त्याच्या क्लब वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका पत्र्यांच्या शेड मध्ये दहा जुगारी हे तिरर्ट नावाचा जुगार खेळताना अढळून आले. पोलिसांनी त्यांच्या कडून मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.
या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाली की, केज येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल टी हाऊसच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांचे अधिनिस्त अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते व पोलिस नाईक शमीम पाशा यांना सोबत घेऊन शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रात्री ९:३० वा. सदर ठिकाणी अचानक धाड टाकली.
दहा जुगारी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून नगदी रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकूण ३३ हजार ३३० रु. मुद्देमालासह जप्त केले.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या फिर्यादी वरून दहा जुगाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
stay connected