*शेतीपंपाची लाईट जोडा अन्यथा रासप रस्त्यावर उतरेल.डाॅ.शिवाजी शेंडगे*
--------------------------------
संदिप जाधव/ आष्टी
गेली काही महीन्यापूर्वीआष्टी तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला होता.
अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ही झाले होते.
महसुलचे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले.बांध झिझले परंतु शेतकऱ्यांना काडीचीही आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही.
त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांचा गहु,कांदा,हारभरा या पिकांची जोरात लागवड सुरू असतानाच या विजवितरण कंपनीने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या विज पंपाचे कनेक्शन तोडले आहे.
हे योग्य नाही.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात विज कनेक्शन तोडने हे सरकारचे धोरण अत्यंत चूकीचे आहे.
शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात या सरकारने जपले पाहिजे.नसेल जपता येत तर राजीनामा द्यावा असा संतप्त सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ शिवाजीराव शेंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
आमदारांना ५०खोके दिले जातात मग या जगाच्या पोशिंद्याला मोफत विज कनेक्शन दिले तर काय बिघडेल. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या सरकारने हिसकुन घेऊ नये.त्यामुळे शेतीपंपाचे विज कनेक्शन जोडावे. नसता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनात शेतकऱ्यांच्या हातुन अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही डॉ शिवाजी शेंडगे यांनी दिला आहे.
stay connected