हाकेवाडी ग्रामपंचायत बचाव पॅनलच्या माध्यमातून युवा नेते दीपक महाजन सरपंच पदाची निवडणूक लढवणार.
..दादा पवळ प्रतिनिधी:
धामणगाव मधील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी हाकेवाडी ग्रामपंचायत .आष्टी तालुक्यातील जवळपास 109 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत .गाव स्तरावर विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार. तसेच शासनाच्या विविध निधीतून गावाला स्वयंपूर्ण बनवणारी खेडे गावाला स्मार्ट गावाची दर्जा प्राप्त करून देणारी ही ग्रामपंचायत स्थानिक संस्थेची सर्वात महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यातच सर्व गावकऱ्यांच्या आग्रहस्तावर दीपक महाजन यांनी निवडणूक लढवावी अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे .त्यातच दीपक महाजन यांचे सार्वजनिक काम करण्याची पद्धत आणि समाज सेवेची आवड असल्याने दीपक महाजन यांनी निवडणूक लढवावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे युवा नेते दीपक महाजन यांच्या प्रयत्नाने गावातील सर्व युवकांना सोबत घेऊन हाकेवाडी ग्रामपंचायत बचाव पॅनलच्या माध्यमातून यंदाची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक लढवणार आहे. स्वच्छ आणि निर्व्यसनी सुशिक्षित उच्च विचारसरणी असलेला हा तरुण सर्व गुण संपन्न अशी प्रतिमा असलेला हा नवतरुण आपले नशीब ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आज मावतोय.
गावातील तरुण निर्वसनी गुणवान चरित्र संपन्न समाजसेवेची आवड असणाऱ्या तरुणांनी या पॅनलच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सहभागी व्हावी असे आवाहन पॅनल प्रमुख दीपक महाजन यांनी केले आहे. दीपक महाजन यांच्या संकल्पनेतील पुढील ग्रामपंचायतची कार्य असे असेल गावातील रस्ते चांगले व्हावे गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन चांगले व्हावे नळ योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावी .भूमिगत गटारे व्हावेत .गाव हागणदारी मुक्त व्हावे. शौचालय योजना राबवाने. घरकुल योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार असे ध्येय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय तरी येत्या निवडणुकीत सुशिक्षित तरुणांचा टक्का वाढला आहे. तर कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदार राजांनी गावाच्या सर्वांगीण विकास व कायापालट करणाऱ्या कर्तुत्वान युवकांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकावी असे आवाहन पॅनल प्रमुख युवा नेते दीपक महाजन यांनी केले आहे.
stay connected