मुंबईतील बीडीडी चाळी आता बाळासाहेब ठाकरे,शरद पवार आणि राजीव गांधींच्या नावाने ओळखल्या जाणार....?
नामकरणाचा शासकीय निर्णय जारी....!!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.३ मुंबई :मुंबई: वरळीतील बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ ही शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. या संबंधितील नामकरणाचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीची पुर्नविकास योजना कार्यान्वित झालेली आहे. मुंबईतील ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या गोष्टी सरकारच्या अजेंड्यावर आहेत.
बीडीडी चाळीतल्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना हक्काच्या घरांसाठी ५० लाखांची किंमत जाहीर करण्यात आली होती. परंतु ही किंमत कमी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार, नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवसेना नेते वरळी, नायगांव पोलीस वसाहतीमध्ये जाऊन पोलीस कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. ५० लाख रुपयाच्या किंमतीवरुन पोलीस परिवाराचं मत जाणून घेणार आहे.
मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर ५० लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. परंतु यावरुन राजकारण सुरु झालं. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक ठरेल, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.
stay connected