मोटार सायकल अपघातात एका इसमाचा मृत्यु
* जामखेड -प्रतिनिधी*
*जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर सारोळा गावानजीक एका खड्ड्यामध्ये पडून त्याच्या अंगावर मोटारसायकल पडून ॶंदाजे रात्री एकच्या सुमारास जामखेड वरून घोडेगाव ला जात असताना राजकुमार रत्नाकर शेळके वय ४० मुकाम पोस्ट घोडेगाव तालुका जामखेड हल्ली मुक्काम पुणे हा जागीच ठार झाला घटनेची माहिती पोलिस कॉन्स्टेबल भागवत यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली असता कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदर व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणला असून पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे या कामी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सगर, पोलीस नाईक भागवत हे पाहत आहे तसेच या कामी महेंद्र शिरसागर यांनी कोठारी यांना मदत केली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी पोस्टमार्टम केले आहे*
stay connected