मुख्य चौकातील रस्त्यावर गटारीच्या पाण्याचे साचले डबके
धानोरा (प्रतिनिधी ) -
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे वार्ड क्रमांक एक मध्ये नाट्यगृहासमोर मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी साचुन मोठे डबके तयार झाले आहे . यामध्ये मोकाट वराहांना स्वैर विहार करण्याची सोय झाली आहे . गटारी तुंबल्यामुळे मच्छरांचे प्रमाण प्रचंड वाढले असुन रोगराईला आमंत्रण देत आहेत . गटारीचे घाण पाणी रस्त्यांवर साचल्याने ग्रामस्थांना ये - जा करणे अवघड झाले आहे . तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन नाल्या सफाई कामाला सुरुवात करावी जेणेकरून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोकादायक ठरणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव कमी होईल व मोकाट वराहांचा रस्त्यावरचा वावर कमी होईल . वार्ड क्रमांक एक मध्ये गावातील एकमेव स्वस्त धान्य दुकान असुन संपूर्ण गावच्या ग्रामस्थांना वार्ड क्रमांक १ मध्ये हजेरी लावावी लागते आणि याच वार्डात रस्यावर गटारीचे पाणी साचल्याने ग्रामपंचायत च्या नावाने बोटे मोडताना ग्रामस्थ दिसत आहेत . तात्काळ नाल्या सफाई कर्मचाऱ्यांना आदेश देऊन रस्त्यावर पसरणाऱ्या घाण पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थां मधुन होत आहे .
stay connected