म्हाडाच्या घरांची मुंबई पुण्यासह इतर भागातही दिवाळीत सोडत निघणार....

 म्हाडाच्या घरांची मुंबई पुण्यासह इतर भागातही दिवाळीत सोडत निघणार....



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.३ मुंबई : मुंबई, पुण्यामध्ये घरं घेण्याचा प्लॅन घेणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच म्हाडा कडून येत्या काही महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरांत सामान्यांना घरं विकत घेण्याची अजून एक संधी येत्या काही दिवसांत उप्लब्ध होणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल माहिती देत ट्वीट केले आहे. मुंबईत दिवाळीमध्ये ३००० घरांसाठी सोडत निघण्याची शक्यता आहे.

मुंबईत ३००० आणि पुण्यात पिंपरी-चिंचवड भागात देखील चार ते पावणेपाच हजार घरांसाठी सोडत काढण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागात घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मुंबई मध्ये दिवसभर कष्ट करून राहणारी लोकं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये गर्दी वाढत आहे आणि घराच्या किंमती सामान्यांच्या हाताबाहेर जात आहेत. अशामध्ये आता म्हाडा कडून अंबरनाथ मध्ये मोठी टाऊनशीप बांधली जाणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यात ४७४४ घरांसाठी सोडत निघणार असून त्यामध्ये २०९२ घरं ही २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर २६८५ घरं सर्व गटांसाठी असतील. २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुण्यातील येरवडा, कसबा पेठ, महमंदवाडी, केशवनगर- मुंढवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगांव, पाषाण, खराडी या भागासह पिंपरी चिंचवडमधील वाकड, थेरगाव, मुंढवा, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली, पुनावळे, मामुर्डी या भागांमध्ये २०९२ घरं उपलब्ध असतील. ही अत्यल्प, अल्प गटांसाठी असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.