गोरख भाऊ देवराव शेळके यांची पुणे येथे ( सि आय डी ) पोलीस निरीक्षक ( P.I. ) पदी पदोन्नती , ग्रामस्थांनी केले अभिनंदन
धानोरा (प्रतिनिधी ) -
आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे सुपूत्र गोरख भाऊ देवराव शेळके यांची पुणे येथे ( सि आय डी ) पोलीस निरीक्षक ( P.I. ) पदी पदोन्नती झाली आहे . त्यांच्या या यशाबद्दल धानोरा ग्रामपंचायत व ग्रामस्थां तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला .
गोरखभाऊ शेळके हे 1986 साली एस आर पी मध्ये भरती झाले . त्यांनी दौंड येथे 5 वर्षे काम केले . त्यानंतर राजुरा चंद्रपुर येथे 8 वर्षे श्वानपथक सांभाळले . त्यानंतर नाशिक ग्रामीण मध्ये 12 वर्षे सेवा केली . पुणे येथे CID मध्ये 5 वर्षे तर सोलापूर येथे 1 वर्षे कर्तव्य पार पाडले . सद्या ते पुणे येथे CID च्या PI ( पोलीस निरिक्षक ) पदावर कार्यरत आहेत . त्यांच्या प्रामाणिक व कार्यक्षम सेवेमुळे त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे . गोरख भाऊ हे कार्यतत्पर , मनमिळावू व शांत संयमी स्वभावाचे असुन त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे . त्यांच्या यशाबद्दल त्यांचे धानोरा ग्रामपंचायत व ग्रामस्थां तर्फे अभिनंदन करण्यात आले . यावेळी सरपंच देविदास उदावंत , उपसरपंच सय्यद युनूस , सय्यद अन्सार , संतोष थोरवे , पत्रकार सय्यद बबलू , तुकाराम मोरे , नवनाथ होळकर , गोरख शेळके , सर्जेराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते .
stay connected