तेजवार्ता प्रतिनिधी
भारत मरकड
मढी /पाथर्डी
पाथर्डी तालुक्यात प्रत्येक गावागावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज विशेष पाथर्डी शहरातील जयंती लक्ष्यवेधी ठरली या निमित्ताने प्रामुख्याने तिसगाव आणि श्री क्षेत्र मढी येथे उत्साहात भिम जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावामध्ये सकाळी प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत मध्ये मोठ्या उत्साहात भिमजयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील शाळेतील मुला/मुलींनी खुप चांगल्या पध्दतीने भाषण करुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची गौरव गाथा सांगीतली यावेळी विशेष कु भक्ती एकनाथ मरकड च भाषण लक्ष्य वेधी ठरल त्यानंतर संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली या प्रसंगी मढी गावचे उप सरपंच मा. रविंद्रभाऊ आरोळे मा शैलेंद्र बोंदाडे मा. एकनाथ मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी गावातील वि. वि. का. सो ह्वाईस चेअरमन मा. भाऊसाहेब मरकड शिवसेना नेते आंबादास आरोळे अध्यक्ष दलित पॅंथर मा. कलिंदरभाई शेख कवाडे गटाचे तालुका अध्यक्ष विलासराव गजभिव मा. एकनाथ मरकड मा बाबा शेख मा. राजेश मढीकर ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पाखरे मा दत्ताभाऊ साळवे गजानन मरकड मा. साईनाथ मरकड मा फीरोजभाई शेख मा. रावसाहेब आरोळे मा. प्रकाशजी महाराज क्षीरसागर मा. बालु मरकड यांच्या प्रमुख उपस्थितीत भिम जयंती साजरी करण्यात आली
stay connected