उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयोन कंपनीत अपघात
प्लॅन्टमधे पडून कर्मचाऱ्याचा मृत्यु
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१४ उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरच्या प्रसिद्ध सेंच्युरी रेयोन कंपनीत एका कामगाराचा प्लॅन्ट मधे पडून मृत्यु झाल्याची घटना घटना मंगळवारी रात्री घडली आहे.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.अनिलकुमार झा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.झा हे प्लॅन्टमधे पडलेले पाहताच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलीस आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली.अग्निशामक दलाने त्यांस तात्काळ बाहेर काढत मध्यवर्ती रुग्णालयात नेले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,उल्हासनगरच्या शहाड परिसरात सेंच्युरी रेयोंन ही कंपनी आहे.या कंपनीच्या व्हीस्कोस प्रोडक्शन विभागात अनिल कुमार झा हे कार्यरत होते.मंगळवारी रात्री ते डीझोलवर प्लांटमधे पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.कंपनीचे सुरक्षा अधिकारी जितेंद्र सिंग यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दल आणि उल्हासनगर पोलिसांना या अपघाताबाबतची माहिती दिली.यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी अनिल कुमार झा यांना बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
stay connected