गायकवाड जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी

 गायकवाड जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी





आज १४ एप्रिल गायकवाड जळगाव येथे

 महामानव ,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आणि दाखल पात्र विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी ,दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी घेण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आणि शाळेतील सर्व सहकारी शिक्षक  मिळून घेतला. दोन्ही कार्यक्रमाचे स्वरूप जरी भिन्न असले, तरी दोन्हीही कार्यक्रम उद्देश प्रमाणेच व्हावे , आणि एकमेकांना पूरक व्हावेत, या दृष्टीने नियोजन केले, गावातील युवक, शिक्षण प्रेमी युवक, अंगणवाडी ताई, स्वयंसेवक, सर्वांनी , कोणते काम करावे ,आणखी काय करता येईल ,या विषयी कागदावर नियोजन केले जबाबदारी वाटून घेतली , अगदी मुलांच्या स्वागतगीत सादर करण्यास पासून आभारापर्यंत  ,लाहांगांग्यांना सजवण्यापासून स्टॉल लवण्यापर्यंत ची सर्व बारीक सारीक कामाचे, शाळा सजवण्याचे नियोजन करण्यात आले.पहिल्या दिवशीच रांगोळी, मार्किंग फक्की, झिर्माळ्या , टोप्या, रिबीन, कात्री,कार्ड शीट , याची खरेदी करून सकाळी च सर्वजण शाळेवर हजर झाले,  नियोजनाप्रमाणे ,सुरुवातीला जाधव सर ,राठोड सर, भाकरे सर ,यांनी शाळेचे ग्राउंड स्वच्छ,करणे , आखणे, झिरमाल्या ,लावणे आदी काम हाती घेतले, आणि थोड्या वेळात च  शाळेचा सर्व परिसर सुंदर दिसू लागला, डेस्क आले ,साऊंड, माईक , टेबल खुर्च्या, नी त्यांची जागा घेतली..डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा  ठेऊन सजवण्यात आली. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष ,यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष केले, मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, ,सजलेला ,आणि फुगे लावलेला  फुललेला  परिसरात कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातिला डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली, सुंदर आणि प्रभावी सूत्र संचालन शाळेचे सह  शिक्षक श्री भडांगे सर यांनी केले. मुलांनी सुस्वरात स्वागतगीत सादर केले सकाळच्या वातावरणात हार्मोनियम च्या साथीने ते खूप च प्रभावी झाले. मुलांनी विविध गीते सादर केली मुलांची ,आणि शिक्षकांची भाषणे तर आणखी वरच्या दर्जाची, यातून खरोखरच आंबेडकरांच्या जीवन रुपी प्रवास, त्यांचे कार्य , दिलेले योगदान , यांचा सहज उलगडा होऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमानंतर लगेच    लहानग्या मुलांना घेऊन अंगणवाडी ताई आल्या ,शाळेच्या मुख्य भिंती लगत स्टॉल विविध साहित्याने सजलेले होते. शाळेच्या गेटला रिबीन बाधून तयार होती, सर्व पात्र बालकांचे स्वागत गेटवरच करण्यात आले , गावातील तरुण कार्यकर्ते शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर हरिभाऊ केसभट यांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली,  नवीन बालकांचे स्वागत करण्यासाठी गेटच्या दोन्ही बाजूने मोठ्या विद्यार्थ्यांनी रांगा करून टाळ्या वाजवून स्वागत केले.या कामात श्री.जाधव सर,भाकरे सर,राठोड सर यांनी खूप छान नियोजन केले, यानंतर, पालकांचा मेळावा घेऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व  सांगण्यात आले व या मेळाव्याचा उद्देश समजून सांगण्यात आला. त्यानंतर मुलांच्या वजन , ऊंची, घेऊन , सेल्फी पॉइंट वरून मुलांचे फोटो ही काढण्यात आले, निश्चितच लहानग्यांना हा अनुभव नवीन होता. ते कुतूहलाने सर्व पाहत होते. निरीक्षण करत होते, त्या नंतर सर्व शिक्षकांनी आपापल्या स्टॉल चा ताबा घेतला, आणि एकानंतर एक मुलांनी तेथे , प्रवेश केला, शिक्षकांनी विद्या्थ्यांना विविध प्रश्न विचारले ,छोट्या मुलांनीही ना घाबरता उत्साहात उत्तरे दिली . दोन्ही कार्यक्रम आतिश य परिणामकारक आणि नियोजनबद्ध पार पडले. मुलांना खाऊ वाटप करून करून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक , श्री जाधव सर ,श्री भाकरे सर, श्री राठोड सर,श्री भडांगे सर,व अंगणवाडी ताई सौ गालफाडे ताई, शाळेतील मुले ,पालक ,गावातील तरुण, मंडळी, शिक्षण प्रेमी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण समिती अध्यक्ष श्री .नामदेव केसभट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनीधी पत्रकार हरिभाऊ केसभट, शेवगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.