*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथे गोर गरीब मुलांना शालेय साहित्य आणि फळे वाटप करून साजरी करण्यात आली*
आज आष्टी येथील नवजीवन संगोपन केंद्रात अनाथ, निराधार,ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, वंचित घटकातील, गोर गरीब मुलांना शालेय साहित्य आणि फळे वाटप करून साजरी केली.
या कार्यक्रमासाठी ज्योत फाउंडेशन चे अध्यक्ष मान.संतोष थोरात यांनी शालेय साहित्य आणि फळे तसेच उकडलेले अंडे ई.मदत करून सहकार्य केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते,उद्योजक आदरणीय भागचंद झांजे,शिवसेना नेते मुटकुळे काका, भास्कर अकॅडमी चे संचालक विजय राजपुरे,सुरज शिंदे,महेश मुरकुटे,प्रवीण पगारे,तसेच नवजीवन संगोपन केंद्राचे अध्यक्ष विकास म्हस्के मेजर आणि सचिव तेजस्विनी मासाळकर,संस्थेचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.भागचंद झांजे यांनी अतिशय अभ्यासू पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली.तसेच नवजीवन संगोपन केंद्रास भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन काही अडचण आल्यास आम्ही सर्व शक्तिनिशी पाठीशी उभे राहू असे आश्वासन दिले.तसेच अध्यक्षीय भाषणात बोलताना संतोष थोरात म्हणाले की सामाजिक कार्य करताना खूप अडचणी येतात.परंतु म्हस्के दाम्पत्य नवजीवन संगोपन केंद्र याच्या मार्फत जे सामाजिक कार्य करतात ते खूप चांगले आणि गरजेचे काम आहे.आम्ही वेळोवेळी मदत करू असे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी प्रा.विजय राजपुरे यांनी प्रास्ताविक केले.आणि नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी सर्वांचे आभार मानले.
stay connected