सांगवी पाटण येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात संपन्न झाली.. जहा हर इंसान समान है.. उस ग्रंथ का नाम संविधान है.. ज्यांनी बोलण्याचा अधिकार दिला, धार्मिक स्वातंत्र्य दिले,भाषेचे स्वातंत्र्य दिले, समानता दिली, अन्यायाविरोधात लढण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि मार्ग दिला असे
अखंड प्रेरणा श्रोत,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या कार्य, कर्तृत्वास मनाचा सलाम... सांगवी पाटण येथे सरपंच दत्तात्रय आबा खोटे, उपसरपंच अमोल खिलारे, पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते समीर शेख,ग्रा.पंचायत सदस्य उद्धव भोसले, सद्दाम शेख, अन्सार शेख, फारुख शेख, विलास खंडागळे, सुनील खंडागळे, राजेन्द्र खंडागळे, दत्तात्रय खंडागळे, आश्रुबा खंडागळे, शाशिराव नरवडे, प्रदीप खंडागळे, भीम गर्जना तरुण मित्र मंडळ, महिला सांगवी पाटण येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व हनुमान जयंती निमित्त 15 तारखेला कविता मानवतेच्या व 16 तारखेला आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे तरी पंच क्रोशितील जनतेने लाभ घ्यावा.. असे आव्हान विलास खंडागळे यांनी केले आहे .
stay connected