राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार; एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी

 राज्य शासनाच्या विविध 
विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार;

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी


प्रतिनिधी : संजय पंडित


दि.१३,,मुंबई ;राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त पदांवर भरतीसाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी खात्यातील रिक्त पदांवरील भरतीला अर्थ विभागाने मंजूरी दिली आहे. यानंतर राज्य सरकारकडून याबातचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे.

राज्य शासनाच्या ४३ शासकीय विभागात मिळून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. कोरोना साथीच्या रोगाच्या  काळात अर्थ विभागाने घातलेल्या निर्बंधामुळे भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. मात्र येत्या काळात राज्याच्या विविध विभागांमध्ये पदांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमपीएससी कक्षातील १०० टक्के पदे भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयनुसार सुधारित आकृतीबंध मंजूर केला, त्या आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरता येतील असे राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.

तसेच ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मजूर केले आहेत. अशा सुधारित आकृतीबांधतील एमपीएससी कक्षातील १०० टक्के पदांच्या भरतीस परवानगी देण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांतर्गत ४ मे २०२० चे निर्णय लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय समितीने आणि उपसमितीने मान्यता दिलेली एमपीएससी कक्षातील १०० टक्के पदे भरण्यास मान्यता असेल.

१०८५ पदांची भरती

एमपीएससीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ अंतर्गत १ हजार ८५ पदांची भरती केली जणार आहे. याअंतर्गत १०० सहाय्यक कक्ष अधीकारी, ६०९ राज्य कर निरीक्षक आणि ३७६ पोलीस उपनिरीक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.