कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक दारू विक्री: गेल्या तीन वर्षाचा रेकॉर्ड तोडला... तरीही महसुलात घट....?

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक दारू विक्री:

गेल्या तीन वर्षाचा रेकॉर्ड तोडला...

तरीही महसुलात घट....?



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.१४ मुंबई : गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते.कोरोणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉक डाऊनचा मोठा फटका सर्वच उद्योगधंद्याला बसला.उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांनी आपला रोजगार गमावला.कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांना बसला.महाराष्ट्रात तर रेकॉर्ड ब्रेक कॉरोना रुग्णांची नोंद झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.मात्र अशाही परिस्थितीमध्ये राज्यात दारूची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री झाली.प्राप्त आकडेवारी नुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात तब्बल १७,१७७ कोटी रुपया पेक्षा अधिक दारूची विक्री झाल्याचे समोर आले आहे.त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये २३५८लाख बल्क लिटर दारूची विक्री झाली आहे.

याबाबत बोलताना महाराष्ट्र एक्साईज डिपार्टमेंटच्या वतीने सांगण्यात आले की २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये दारूची विक्री मोठ्याप्रमाणात झाली.दारू विक्रीचे हे प्रमाण मागील तीन आर्थिक वर्षापेक्षा अधिक होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दारूची विक्री झाली.आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधे १७ टक्क्यांनी दारूची विक्री वाढली.मात्र दारू विक्री वाढून देखील दारुतून मिळणाऱ्या महसूल वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नसल्याचे राज्यं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.आर्थिक वर्ष २०२१-२२ मधे दारूच्या विक्रिमधून १८ हजार कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले होते.मात्र यातील ९५ टक्केच टार्गेट पूर्ण झाले आहे.

एक्साईज डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० मधे राज्यात २१५७ लाख बल्क लिटर दारूची विक्री झाली होती.मात्र त्या नंतर राज्यात कोरोणाने शिरकाव केल्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेत दारू विक्रीत घट झाली होती.त्यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मधे दारू विक्रीचा आकडा १९९९ लाख बल्क लिटरवर पोहचला.मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ मधे दारू विक्रीत पुन्हा एकदा वाढ झाली.या काळात तब्बल २३५० लाख बल्क लिटर दारूची विक्री झाली.हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत १७ टक्क्यांनी अधिक होते.याच काळात बियरच्या विक्रीतही विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.