सरपंच सावता ससाणे यांनी १ लक्ष रुपये खर्चून स्वखर्चाने डीपी बसवून गावाला केला पाणीपुरवठा
आष्टी ( अनिल मोरे ) :-
तालुक्यातील टाकळी आमिया गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या मेहकरी धरणातील विहीरिवर स्वतंत्र डिपी नसल्याने शेतक-यांच्या डीपी वर आजपर्यंत वीज कनेक्शन चालु होते.परंतु तेथील शेतकरी वारंवार केबल काढून टाकीत होते ऐन उन्हाळ्यामध्ये गावातील लोकांना पाण्याअभावी खूप त्रासाला समोर जावे लागत होते.पाण्याअभावी ग्रामस्थांची हेळसांड होत होती. हा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून सरपंच सावता ससाणे स्वतः पदमोड करून १ लक्ष रुपये खर्चून स्वतंत्र डीपी,तारा,संपूर्ण खर्च स्वतः केल्याने त्यांच्या समाजकार्यातून माणूसकीचे दर्शन घडवले त्यांचे टाकळी अमिया ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमियाचे सरपंच सावता ससाणे नेहमीच सामाजिक कार्यात सुख दुःखात स्वतः च्या खिशातील पैसे घालून कामे करतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावक-यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.मेहकरी धरणातुन टाकळी गावाला पाणीपुरवठा होत असून स्वतंत्र डीपी नसल्याने विज पुरवठा शेतकरी वारंवार खंडीत करीत होते.यामुळे ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने स्वखर्चाने १ लक्ष रुपये च्या वर स्वखर्चाने पोल, तारा,डीपी सांगाडा आणि डीपी बसवण्याचे काम सर्व सदस्यना बरोबर घेऊन जाऊन प्रत्यक्ष काम स्वता:उभा राहून काम करण्यास सुरुवात केली.येत्या १ ते २ दिवसात स्वतंत्र डीपी बसवल्यामुळे विजेचा प्रश्नन कायमचा संपणार आहे. त्यामुळे इथून पुढे पाणी पुरवठा सुरळित होणार आहे.त्याप्रसंगी उपसरपंच विष्णू निबाळकर ,संतोष पाटील चौधरी,बबन शेंडगे,ग्रामसेवक राठोड,शिवाजी महारनवर, बबन चौधरी, देवकर साहेब आदी उपस्थित होते.सरपंच सावता ससाणे यांनी गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला त्या बद्दल सर्व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले
stay connected