कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट...!
नाटकाला वेळेत पोहचता यावे म्हणून अभिनेता सागर कारंडेचा लोकलने प्रवास....?
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२ मुंबई : कलाकार मंडळी म्हटलं की त्याचा एक वेगळा रूबाब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण काही अभिनेते-अभिनेत्री या सगळ्या कल्पनांना छेद देल साधं राहाणं पसंत करतात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे सध्या त्याच्या अश्याच साधेपणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतंच नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
अभिनेता सागर कारंडेने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याला त्याने “नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकलने प्रवास…”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोला १५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर तुझ्यातला साधेपणा आवडला असं अनेकांनी कमेंट करत सांगितलं आहे. एकाने सागरला तुला गर्दीत चढता आलं का? असा प्रश्न विचारला. तर दुसऱ्याने सागर तु मास्क लावल्यानं तुला ट्रेनमध्ये कुणी ओळखलं नाही, अशी कमेंट केली आहे.
stay connected