प्रविण भिसे प्रतिनिधी
*जलसंधारण मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाटपाण्याचे ढिसाळ नियोजन*
नेवासा तालुक्याचे मा. आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देऊन पाटपाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही याबद्दल निवेदन दिले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी घोडेगाव चे सरपंच राजेंद्र देसरडा माजी सरपंच पारसशेठ चोरडिया, किरण जावळे, शरद जाधव, वसंतराव काळे उपस्थित होते
नेवासा तालुक्यामध्ये पाटपाण्याच्या नियोजना अभावी तालुक्यातील उभ्या पिकाची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे याला सर्वस्वी जबाबदार नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधीचे पाटपाण्याचे ढिसाळ नियोजना मुळे झाली आहे.
मुळा उजवा कालवा पाणी रोटेशन चालू आसतानी धरणांमध्येही सुमारे 17 टीएमसी मुबलक पाणीसाठा असताना योग्य वेळेत पाटाचे पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके ऊस कांदा सोयाबीन व फळबागा पाण्याअभावी पिक वाया गेली आहेत.शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर नेवासा तालुक्यातील पाणी वाटप संस्थेकडून शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नाही आणि पाणीपट्टी नियम बाह्य अवाच्या सव्वा प्रमाणे वसुली केली जाते. आज नेवासा तालुक्यातील टेल ची सर्व गावे माका, पाचुंदा, तेलकुडगाव, जेऊर,चीलेखनवाडी, कुकाना , अंतरवाली नांदूर ,सुकळी ,पिंपरी, गेवराई, तरवडी, सुलतनपूर पाथरवाला, वाकडी, शिरजगाव, सलाबतपुर ,दिंडेगाव, जळका , चिंचोली, बाभूळखेडा मुकिंदापूर मक्तापूर, गोंडेगाव ,म्हसले ,हंडीनिमगाव, उस्थळ, खरवंडी तामसवाडी, या गावांना पाट पाण्याचे रोटेशन येऊन महिना झाला तरी देखील आणखी पाणी मिळालेले नाही आणि या गावांना आणखी दहा दिवस पाणी मिळेल ही शास्वती नाही. धरणात आज 17 टीएमसी पाणी आजमितीला शिल्लक असताना केवळ आणि केवळ मागील रोटेशन वेळेवर न सोडल्यामुळे शेतकऱ्यांची आज अशी दयनीय अवस्था झालेली आहे .त्याला जबाबदार कोण? झालेले शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई शासन करून देणार का? असे सर्व प्रश्न ढिसाळ नियोजनाचा अभाव यामुळे शेतकरी करत आहे. शेतकरी हवालदिल झालेला असताना कारखान्याचे उसाचे नियोजन योग्य केले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला असताना, अशा सर्व परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. जर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाट वितरेकाला पाटपण्याचे पूर्ण क्षमतेने नियोजन झाले नाही तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार राहील जर पाण्याचे नियोजन चांगले झाले नाही आणि शेतकऱ्यांना पिकाला पाणी मिळाले नाही तर शेतकरी मोठे उग्र आंदोलन करण्याची तयारीत आहे याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील
stay connected