डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना झाल्याने बुधवारी जामखेड शहर बंद

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना झाल्याने बुधवारी जामखेड शहर बंद 



जामखेड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे बॅनर विनापरवाना लावले यामुळे  नगरपरिषदे कडून ते बॅनर काढताना विटंबना झाली यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित कर्मचारी यास निलंबीत करावे याबाबत मुख्याधिकारी यांना भेटले परंतु समाधानकारक चर्चा न झाल्याने संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात जाऊन घटनेचा निषेध करून बंदचे निवेदन दिले. याबाबत तहसीलदार यांनी शिष्टाई करून मुख्याधिकारी यांस संबधित कर्मचारी निलंबीत करण्याचे पत्र देण्यास सांगितले पण नागरिकांनी बंद मागे घेतला नाही.         भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अयोजीत कार्यक्रमाचे आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने शहरातील काही भागात बॅनर लावले होते.  जामखेड नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागप्रमुख शंकर बोराटे यांनी सदर बॅनर लावताना परवानगी घेतली नाही म्हणून ते बॅनर मुख्याधिकारी यांच्या परवानगीने उतरवले व त्यातील एक बॅनरची विटंबना झाली यामुळे संतप्त भिमसैनिक व नागरिकांनी याबाबत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना जाब विचारला व संबंधित कर्मचाऱ्या वर कारवाईची मागणी केली. परंतु नागरिकांचे समाधान झाले नाही.             यानंतर संतप्त नागरिकांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून प्रत्यक्ष घडलेली घटना सांगून संबधित कर्मचारी शंकर बोराटे यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी केली. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बरोबर चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करावे याबाबत सांगितले तसा प्रस्ताव तयार करावे असे सांगितले. यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. व जामखेड शहर बंद करून मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे.         यावेळी माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, विकास राळेभात, आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र सदाफुले, उपाध्यक्ष मुकुंद घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन गडदे प्राचार्य विकी घायतडक, शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडूरंग भोसले व मोठय़ा प्रमाणावर भिमसैनिक उपस्थित होते.      जामखेड बंद मागे घेण्यात यावा म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पण त्यास अपयश आले. रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी संबधित कर्मचाऱ्याचे निलंबनाचे आदेश व विटंबना प्रकरणी गुन्हा दाखल करावा व्हावा यासाठी पत्र देणार असल्याचे सांगितले.                      प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.