न्यु सलून पार्लर असोसिएशनच्या सेवाभावी कार्याचा गौरव...
देहूच्या वात्सल्य संस्थेकडून विशेष सन्मान....
प्रतिनिधी : संजय पंडित
जनसेवा हीच ईश्वरी सेवा या विचारांनी प्रेरित होऊन सलून व्यवसायातील न्यू सलून पार्लर असोसियेशन भारत देश या संस्थेद्वारे विविध सेवाभावी उपक्रम राबवून जन सामान्यांना निरपेक्ष मोफत सेवा दिली जाते.
सलून व्यवसायाच्या माध्यमातून गावागावांतील शहीदांची मुले,पोलीस जवानांची मुले. अनाथ आणि डिव्यांग आश्रमातील मुलांना महिन्यातून एक दिवस मोफत सलून सेवा दिली जाते
यामधे प्रामुख्याने हेअर कट, शेवींग,इत्यादी सेवांचा समावेश असतो.
नुकतीच देहू गावातील वात्सल्य या दिव्यांग मुलांच्या आश्रमाला संस्थेने सेवा दिली.
यावेळी स्वतः संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे रायकर यांच्यासह प्रकाश कोडामंगले,अप्पासाहेब हवलदार,सुधीर सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी सेवा दिली.
वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका सौ.ऋषाली देवतारसे यांनी न्यू सलून पार्लर असोसियेशनच्या या सेवाभावी कार्याचा गौरव करून संस्थापक अध्यक्ष सभाजी राजे रायकर यांचा विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
stay connected