डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने *साकेत महाविद्यालय, कल्याण येथे नवनाथ रणखांबे यांचे व्याख्यान संपन्न*

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने


  *साकेत  महाविद्यालय, कल्याण येथे नवनाथ रणखांबे यांचे व्याख्यान संपन्न* 



( प्रतिनिधी कल्याण/ ठाणे) 

         साकेत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इतिहास विभाग, अंतर्गत मूल्यमापन समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्ववंदनीय भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने " भारतीय राज्यघटनेतील  मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये " या विषयावर  साकेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जीवन संघर्षकार नवनाथ रणखाबे यांचे व्याख्यान  संपन्न झाले. 

         कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. शहाजी कांबळे यांनी उपस्थितांना प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्यांनी सांगितलेला प्रज्ञेचा मार्ग स्वीकारून संघटीतपणे मानवहीत आणि समाज हितासाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. वसंत बऱ्हाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारामुळेच भारतीय सर्व समाज गटातील मानव समूह समानतेचे जीवन जगत आहे. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. त्यांनी दिलेले भारतीय संविधान जागत श्रेष्ठ आहे त्याचे जतन करण्याचे प्रतिपादन केले. 

      *प्रमुख वक्ते जीवन संघर्षकार  ॲड. नवनाथ रणखांबे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर बोलताना  2 वर्षे 11 महिने 18 दिवस सखोल अभ्यास ,   अथक मेहनत आणि परिश्रम करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित भारतीय संविधानाची निर्मिती केली.*  *भारत देशाचा कारभार हा संविधानाने चालतो. डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नांतील भारत हा संविधानामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 मधील तरतुदी मुळे भारतीयांना  मूलभूत हक्क मिळाले.*   *संविधान मूल्ये ही क्रांतिवादी आहेत.* 

*भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याचे आपण पालन केले पाहिजे असे  यावेळी  बोलतांना प्रतिपादन  केले.* 

           सदर कार्यक्रमाला साकेत शिक्षण संस्थेचे सचिव साकेत तिवारी, सीईओ श्रीमती शोभा नायर, एनएसएस प्रमुख प्रा. प्रिया नेर्लेकर,  प्रा. प्रकाश जाधव, समन्वयक प्रशिना बिजू, अंतर्गत मूल्यमापन समिती समन्वयक प्रा. पूजा पांडे, प्रा. नमिता बागवे, प्रा. राजेश्री मुंढे, सुविथा सुकमारण, आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा. नवनाथ मुळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.