धानोरा चे माजी उपसरपंच प्रा . सय्यद मुक्तार सर यांचे दुखद निधन

 धानोरा चे माजी उपसरपंच प्रा . सय्यद मुक्तार सर यांचे दुखद निधन



आष्टी- तालुक्यातील धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा धानोरा गावचे माजी उपसरपंच प्रा .सय्यद मुक्तार कादर ( वय-४६) यांचे अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान गुरुवारी (ता.१४) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.१५) दुपारी २ वाजता धानोरा येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले. सय्यद मुक्तार हे धानोरा येथील विनाअनुदानित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनुदान येईल या आशेवर २००३ पासून विना वेतन सेवा दिली. तसेच धानोरा येथील उपसरपंच पद ही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई भाऊ भावजयी असा परिवार आहे. त्यांचा निधनाने धानोरा गावावर शोककळा पसरली आहे . अतिशय अभ्यासू , मनमिळावु व शांत संयमी स्वभावामुळे ते सर्वत्र सुपरिचीत होते . त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता . त्यांच्या दफनविधी प्रसंगी मोठा जनसमुदाय तसेच सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणीक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.