ज्येष्ठ कवयित्री शुभांगी जाधव यांच्या "जिद्द तिच्या अस्मितेची" या स्वलिखित काव्य संग्रहाचे प्रकाशन...
लवकरच समाज भुषण पुरस्काराने होणार सन्मानित...
शब्दांकन : संजय पंडित
नाभिक समाजातील धडाडीच्या कार्यकर्त्या आणि महिला अत्याचाराला वेळोवेळी आपल्या कवी मनातून कडाडून विरोध करणाऱ्या समाजातील उदयोन्मुख कवयित्री सौ.शुभांगीताई सोमनाथ जाधव यांच्या स्त्री जीवनावरील काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच दौंड तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या विठ्ल बन डाळिंब गावी पार पडले.
अखिल भारतीय साहित्य मंडळाचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळाने विठ्ठल मंदिरात राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि काव्य संग्रह प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमात सौ.शुभांगी सोमनाथ जाधव,काशीकर वाकी,ता.बारामती यांच्या स्वलिखीत "जिद्द तुझ्या अस्मितेची" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.यावेळी साहित्य तथा शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष डाळिंब गावच्या सरपंच सौ.वनिता अनिल धीवर होत्या.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ
जयप्रकाश घुमटकर, मुंबई हे होते.
यावेळी कार्यक्रमात जेष्ठ कवयित्री ललिता गावंडे(नाशिक),डॉ.निता बोडके,पुणे,मंगल बोरावके,बारामती,ज्येष्ठ कवी सुरेश लोहार,कराड,मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी वाकी गावचे सरपंच हनुमंतराव जगताप, संत यादव बाबा विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश कांचन सर आणि राजापूर गावचे माजी सरपंच सदाशिव क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात कवयित्री शुभांगी जाधव यांच्या काव्य संग्रहाचे खूप कौतुक केले. खडतर कोटुंबिक जीवनात सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडून मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांनी जाहीर सत्कार करून कवयित्री शुभांगी यांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या काव्य संग्रहात स्त्रीच्या नवनिर्मितीपासून तर तिने घेतलेल्या उत्तुंग भरारीच्या खडतर प्रवासाचे मार्मिक वर्णन करण्यात असेल.
स्त्रीतल्या स्त्रीत्वासाठी आणि स्त्रिअस्तित्वतल्या अस्मितेसाठी सर्व महिलांकरीता कवयित्री शुभांगी जाधव यांचा हा काव्यसंग्रह एक प्रेरणादायी अनमोल ठेवा आहे.
प्रत्येक महिलेने आपल्या संग्रही ठेवून यातून स्फूर्ती घ्यावी असा हा काव्य संग्रह आहे.
स्त्री जीवनात असणाऱ्या अंधकार आणि नाना अडचणी दूर करून दृढ निश्र्चयाच्या बळावर सर्व संकटावर मात करून स्त्री कशी आपल्या धेय्याचे सर्वोच्य शिखर गाठते याचे मार्मिक भाषेत सविस्तर वर्णन लेखिका/कवयित्री शुभांगी जाधव,काशीकर यांनी आपल्या संग्रहात विविध कवितांमधून केले आहे.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महावीर गाडेकर,उपाध्यक्ष संजय पंडित यांनी कवयित्री शुभांगी जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून मराठी साहित्यातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना लवकरच समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्याचे घोषित केले आहे.
या प्रकाशन कार्यक्रमात राज्यातील विविध भागातून आलेल्या साहित्यिकांनी आणि कवींनी आपले दर्जेदार साहित्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमास डाळिंब गावचे आजी, माजी सरपंच,उपसरपंच, उप सरपंच,चेअरमन,व्हॉईस चेअरमन,डाळिंब,वाकी,राजापूर गावचे ग्रामस्थ,मित्र,मैत्रिणी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाळिंब गावचे युवा नेते शंकर काशीकर यांनी मानले
stay connected