खाजगी नोकरदारांना पेन्शन... सरकारची EPFO योजना

 खाजगी नोकरदारांना पेन्शन...

सरकारची EPFO योजना



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.११ मुंबई : नोकरदारांकडून ‘पेन्शन स्कीम-1995’ अंतर्गत किमान निवृत्तीवेतन वाढविण्याची मागणी केली जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निर्णयासाठी प्रलंबित आहे. दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. EPFO सर्वोत्तम निश्चित निवृत्तीवेतन साठी नवीन निवृत्तीवेतन योजना आणण्याच्या तयारीत आहे. नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची निश्चित रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये नोकरदार वर्गासोबतच स्वयं-रोजगारित व्यक्ती देखील नोंदणी करू शकेल. निवृत्तीवेतनासाठी वेतनातून निश्चित स्वरुपाची रक्कम दर महिन्याला कपात केली जाते. निवृत्ती वेतनासाठीची रक्कम वेतन आणि उर्वरित नोकरीच्या कालावधीच्या आधारावर ठरवली जाते. सध्या ईपीएस मध्ये केवळ वेतनधारी वर्गासाठी नोंदणीचा पर्याय आहे. नवीन सुधारित नियम प्रत्यक्षात आल्यास स्वयं-रोजगारित व्यक्ती स्वत:ची नोंदणी करू शकतात.


प्रति महिना/1250 रुपये मर्यादा

EPS मध्ये सध्या रक्कम करमुक्त आहे. मात्र, निवृत्ती वेतनाची किमान रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. सध्या 1250 रुपयांपर्यंत अधिकतम योगदानाची मर्यादा आहे. सध्या निवृत्तीवेतन सुविधेसाठी नोकरदार व्यक्ती पर्याय देण्याच्या तयारीत आहे.


EPS सध्याचा नियम-

नियमानुसार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12% योगदान PF मध्ये वर्ग केले जाते. आस्थापनांद्वारे समान रक्कम वर्ग केली जाते.कर्मचाऱ्याच्या योगदानातून 8.33% हिस्सा EPS मध्ये वर्ग केला जातो. दरम्यान, निवृत्तीवेतन योग्य वेतनाची अधिकतम मर्यादा 15 हजार रुपये आहे. निवृत्ती वेतन फंडात प्रत्येक महिन्याला अधिकतम 1250 रुपये जमा केले जाऊ शकतात.


निवृत्तीवेतनाचं सूत्र जाणून घ्या-

EPS सूत्र = मासिक निवृत्तीवेतन = (निवृत्ती वेतन योग्य वेतन x उर्वरित सेवा कालावधी /70.


जर कुणाचे मासिक वेतन (मागील 5 वर्षांच्या वेतनाची सरासरी) 15 हजार रुपये आणि नोकरीचा कालावधी 30 वर्ष असल्यास प्रति महिना (15,000 X 30)/70 = 6428 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळेल.


विना मर्यादा निवृत्तीवेतन?

जर 15 हजारांची मर्यादा 30 हजार झाल्यास तुम्हाला मिळणारे निवृत्तीवेतन (30,000 X 30)/70 = 12,857 रुपये प्रति महिना


स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी आनंदाची बाब म्हणजे सध्या ईपीएस मध्ये केवळ वेतनधारी वर्गासाठी नोंदणीचा पर्याय आहे. नवीन सुधारित नियम प्रत्यक्षात आल्यास स्वयं-रोजगारित व्यक्ती स्वत:ची नोंदणी करू शकतात. यामध्ये निवृत्ती वेतनाची रक्कम स्वयं-रोजगारित व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या योगदानाच्या नुसार ठरविली जाईल. तुम्हाला जितके निवृत्तीवेतन हवे असेल त्याप्रमाणात योगदान द्यायला हवं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.