वाहिरा उपकेंद्रात पूर्ण दाबाने वीज पुरवठा करा
अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करणार
-----प्रा.दादासाहेब झांजे
****************************
आष्टी उपअभियंता यांना निवेदनाद्वारे इशारा
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील उपकेंद्र ३३/११ के.व्ही.ला अत्यंत कमी दाबाने १३२ के.व्ही. आष्टीवरून विद्युत पुरवठा होत आहे. या कमी दाबामुळे शेती मालाचे अतोनात नुकसान होत असून वीज पंप सुरळीत चालत नाहीत. सदर उपकेंद्रास ८ तास सुरळीत पुर्ण दाबाने विद्युत पुरवठा करा अन्यथा असंख्य शेतकऱ्यांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे आष्टी उपअभियंता यांना पंचायत समिती सदस्यपती प्रा.दादासाहेब झांजे यांनी केला आहे.
या निवेदनात म्हंटले आहे,तालुक्यातील वाहिरा येथे उपकेंद्र ३३/११ के.व्ही. हे असुन या उपकेंद्रावर वाहिरा, पिंपळगाव दाणी, निमगाव बोडखा या फिडरवर अत्यंत कमी दाबाने १३२ के.व्ही. आष्टी वरून विद्युत पुरवठा होत आहे. या कमी दाबामुळे शेतीचे वीज पंप सुरळीत चालत नाहीत. सदर उपकेंद्रास ८ तास सुरळीत
पुर्ण दाबाने विद्युत पुरवठा होणे आवश्यक आहे. परंतू सध्या ७ तास विद्युत पुरवठा
होत असुन त्याच्या विद्युत दाब फार कमी आहे. त्यामुळे लाईट नेहमी ट्रीप होते,केबल जळतात, तारा तुटतात, डी.पी.च्या फ्युजा जळतात तसेच शेतीचे विद्युत पंप जळतात त्यामुळे शेतकरी हैरान झालेले आहेत. तरी सदर वाहीरा उपकेंद्रास आष्टीवरून पुर्ण दाबाचा पुरवठा झाला पाहीजे नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
stay connected