हिजाब ..आक्षेप देशविरोधी कटाचा भाग. --------------------------------- - ॲड. सुभाष सावंगीकर औरंगाबाद.

 हिजाब ..आक्षेप-   देशविरोधी कटाचा भाग.

---------------------------------

- ॲड. सुभाष सावंगीकर औरंगाबाद.


भारतीय नागरिक बांधवांनो,

देशात सध्या हिजाब वरून धार्मिक वाद सुरू करण्यात आला आहे. मला असे वाटते की, यामागची प्रमुख कारणं म्हणजे देशात सद्य स्थितीत होऊ घातलेल्या पाच राज्यांतील निवडणुका आहेत. तसेच आगामी काळातील निवडणुकांसह असंवैधानिक तसेच विषम विचार आणि भूमिका असलेल्या आर.एस.एस, भाजप व त्यांच्या संघटनाना येनकेन प्रकारे "भारत देशाला", "ब्राह्मणांची सर्वांगीण सत्ता-वर्चस्व असलेला, विषमतेवर आधारीत देश म्हणजे हिंदुराष्ट्र" उभे करायचे आहे. त्यासाठी त्यांनी या ना त्या कारणाने देशातील ख्रिश्चन, बौद्ध,शीख ई.सह भारतीय नागरिक मुसलमानांचा छळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच सी.ए.ए.,एन.पी. आर.,आणि एन.आर.सी. सारखे जाचक कायदे करून मुसलमानांना या देशातून एकतर हाकलून लावायचे किंवा मग घुसखोर ठरवून आयुष्यभर  छळ छावणीत डांबायचे, या उद्देशातून हे कायदे केलेले आहेत. 

सद्या हिजाब वरून देशात मुद्दामहून धार्मिक वाद उभा करण्यात आला आहे, असे मला वाटते. कारण जी विद्यार्थिनी हिजाब घालते, ती तिच्या धर्माखातर घालते किंवा संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्यासाठी घालते, किंवा तिच्या इच्छेखातर घालते, तिच्या मर्जीने घालते, तिला मिळालेल्या कौटुंबिक, सामाजिक स्वातंत्र्यामुळे घालते. त्यातून ती काही वेडेवाकडे करतेय किंवा दिसतेय याबाबत इतर धर्मीयांनी द्वेषभावनेतून तिच्यावर लक्ष ठेवण्याचं काही एक कारण नाही. हिजाब घालण्याचा सर्वश्री आधिकार त्या विद्यार्थिनीचा आहे. तिने अंगभर कपडे परिधान करायचे की तोकडे ? हा तिच्या मताचा, विचाराचा, आवडीचा, स्वातंत्र्याचा आणि आधिकाराचा भाग आहे. आपल्या शहरावरून नजर फिरवली तर विद्यार्थिनींना एवढे स्वातंत्र्य आहे, हे आपणास दिसून येईल. म्हणून असमानतेवर आधारित वर्चस्ववादी

पुरूषप्रधान संस्कृती इथे बळजबरीने तीच्यावर लादण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. आणि तसा प्रयत्न ही कोणी करू नये.

हिजाब आमची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, असे म्हणत जर विद्यार्थिनी हिजाब घालत असतील तर ही परंपरा मानायची की नाही? हे त्यांनाच ठरवू द्यावं.याचं उत्तर त्यांनाच देऊ द्यावं. त्यात इतर धर्मीयांनी हस्तक्षेप करण्याची काही अवश्यकता नाही.

खरे तर आपण हे समजून घ्यायला हवे की, मुळात हा वाद महाविद्यालयीन व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक उभा केलेला आहे. शाळा, महाविद्यालयातील रस्त्यांवरून किंवा त्या परिसरात विद्यार्थिनी हिजाब परिधान करून वावरतात याबाबत कोणाला वाईट वाटण्याचे,किंवा आमचा धर्म बुडतोय किंवा आमचे मन दुखावतेय असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. परंतू या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे भाजप चे आमदार रघुपती भट हे आहेत. हे आपण आधी समजून घेतले पाहीजे.

ते तेथील एक मातब्बर नेते आहेत.आणि देशात सद्या निवडणूका सुरू आहेत. आणि अशा प्रकारातून त्यांना त्यांच्या सोईच्या

मतांचं धृवीकरण करणं सहज शक्य आहे. त्यामुळे एवढ्या  चांगल्या संधीचे सोने करण्यात "संघी" तर नक्कीच पटाईत आहेत. ते ही संधी कशी बरे हातची जाऊ देतील? या दृष्टिकोनातूनही विचार झाला पाहीजे.परंतू मला असे वाटते की, केवळ सत्तेत जाण्याचा एक सोपा मार्ग म्हणून, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा, शांततेचा आणि  सर्वधर्मसमभावाचा बळी

देऊन जाण्याचा नसला पाहीजे. त्यामुळे संघाचा हा एक देशविरोधी कटाचा भाग आहे हे सिद्ध होतेय. याला बळकटी दिली ती अभाविप, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, एस डी पी आय सारख्या संघटनांनी. तसेच त्यांच्या सोबतच्या झुंडीनी आणि त्यांनी पोसलेल्या गुंड मुलांनी गळ्यात भगवे गमचे घालून आणि जयश्रिराम चा रस्त्यावर धुडगूस घालून. जरा विचार करा, हा वाद आताच का उभा केला गेला आहे? यापूर्वीच का नाही ? किंवा यानंतर का नाही? खरे तर असे वाद देशात उभा करण्यात येऊच नयेत,या मताचा मी आहे. असे वाद उभा करणारी मानसिकता आर.एस.एस, भाजपवादी आहे की संविधानवादी? तर ती नक्कीच संविधानवादी नाही. मग या संविधानिक भारतात कर्नाटक सरकारने या महाविद्यालयीन व्यवस्थापनाविरूद्ध काय कार्यवाही केली? आणि जर  केली नसेल तर अद्यापही का नाही केली? हा प्रश्न अनुत्तरित आहेच.

विद्यार्थीनी शाळां - महाविद्यालयाच्या युनिफॉर्म सोबतच हिजाब परिधान करीत होत्या. कालपर्यंत त्यावर कोणाचा काही आक्षेप नव्हता. परंतू

"वर्गात बसायचे असेल तर हिजाब घालू नका", असा मनुवादी हुकूम भाजप आमदार अध्यक्ष असलेल्या व्यवस्थापनाने अचानकच कसा काय काढला? कोणाच्या सांगण्यावरून काढला? या मागच्या कटाचे खरे सूत्रधार कोण आहेत? त्यांचे हात बांधून त्यांना देशासमोर आणले पाहीजे. त्यांना देशाच्या चौकात उभे केले पाहिजे.आणि याचा जाब त्यांना विचारला पाहीजे.

विद्यार्थिनी हिजाब घालून येतात म्हणून आम्ही गळ्यात भगवे गमचे घालून येऊ, हे काय त्यावरचं

उत्तर झालं? हि काय वैचारिक भूमिका झाली? हे काय शहाणपण झालं? हे काय एकमेकांना सामावून घेणं झालं? ते  हिरवं करतात तर आम्ही भगवं  करू, हे काय त्याचं उत्तर होऊ शकतं ? यात 

सर्वधर्मसमभावाची बीजे नाहीत.यात देश एकसंध ठेवण्याचा भाव नाही.

तर यात फुटीरतावाद टिच्चून भरलेला दिसून येतो. यात परधर्मीय द्वेष आहे. यात हटवादीपणा आहे. यातूनच पुढे धर्मांध तेढ निर्माण होण्यास मदत होते. आणि हा धर्मांध तेढ देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे, मारक आहे. यातून देश एकसंध उभा कसा राहणार? विद्यार्थिनी तर शाळां- महाविद्यालयाचा युनिफॉर्म घालतातच.परंतू हिजाब परिधान करण्यावरून मुद्दामहून वाद उकरून काढून तो पेटता ठेवायचा,त्याच्या धुराने देश काळवंडून टाकायचा हा प्रकार देशाच्या एकात्मतेला नख लावणारा आहे .

देशातील वाढती गरीबी, महागाई, भूखमरी, कुपोषण, दारिद्र्य,  बेरोजगारी, हतबलता, असहाय्यतेने लोक त्रस्त आहेत.यावर कोणी बोलू नये, देशात या विषयावर चर्चा होऊ नयेत, देशाचं लक्ष या मुद्द्यांवरून भरकटवून, त्यांच्यात 

धार्मिक उष्णता वाढवून देशात धर्मांधअग्नीकुंडातील आगडोंब धगधगता ठेवायचा, हे त्यामागचे आर.एस.एस. भाजपचे व त्यांच्या संघटना झुंडीचे षडयंत्र यामुळेच सर्वांनी मिळून  हानून पाडले पाहीजे.

आता हे प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. संविधानासह धर्म,संस्कृती,

परंपरा,स्वातंत्र्य ई.सर्वच बाबींचा अन्वयार्थ लावल्या जाईल आणि यथोचित निर्णय होईल अशी अपेक्षा करू या. तोपर्यंत देशात कायदा आणि सुव्यवस्था, एकता,अखंडता,बंधुभाव,सौहार्द, शांतता आबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या. आणि येथून पुढे आम्ही अशा देशविघातक मुद्द्यांवरून देशाचं लक्ष विचलित होऊ देणार नाहीत, देशाला आपल्याच हातून गालबोट लावणार नाहीत,अशी भारतीय नागरिक म्हणून शपथ घेऊन या.

धन्यवाद. 

ॲड. सुभाष सावंगीकर औरंगाबाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.