*अपना सपना...*
जा लवकर बीडला
आणा नवीकोरी साडी
काल तिच्या सपनात
आली म्हणे रेलगाडी!
भोंगा वाजं नगरात
परळीत निघं धूर
बीड ठेसनात गर्दी
ती लाजून झाली चूर्र
व्हईन म्हणं म्हतारी
लवकर करा तयारी
'बसायचं' असल त्
आष्टीची करा वारी
दोनतीन गेल्या पिढ्या
आता पुढची जाईन
तोपर्यंत म्हणा धनी
एक विमान घेईन!
सरका जरा बाजूला
मला उठायची घाई
मतदाना आणा नोटा
लावली बोटाला शाई
*विठ्ठल जाधव*
शिरूरकासार, जि.बीड
मो.९४२१४४२९९५
stay connected