नगर बीड दौलावडगाव महामार्ग ठरतोय जीवघेणा
महामार्गावर त्वरीत दिशादर्शक फलक बसवा सुरेश कांबळे यांची मागणी
आष्टी (प्रतिनिधी )नगर-बीड दोलावडगाव अमळनेर महाराष्ट्र राज्य रस्ता क्रमांक 22 असून या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात घडत आहेत त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना मात्र आपला जीव गमवावा लागत असल्याची चित्र सध्या दिसत आहे तरी या महामार्ग व त्वरित दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी जनहीय लोकशाही पार्टी बीड जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे या महामार्गावर दररोज अपघाताची घटना घडत आहेत या अपघातात अनेकांचे बळी जात आहेत त्यामुळे या महामार्गावरील प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे गेल्या वर्षभरात या महामार्गावर 70 ते 80 पेक्षा अधिक बळी गेले आहेत हा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे ते कुठेही दिसत नाहीत त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडतात महामार्गावर कोठे दिशादर्शक फलक नाही तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पूर्ण पुणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते हा महामार्ग प्रवाशांसाठी सुखकर होण्याऐवजी जीवघेणा ठरत आहे गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तरुण युवकाला याच महामार्गावर धडक दिल्याने राजू लोखंडे वय वर्षे 47 या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे याआधीही मसोबावाडी येथील वळणावर अनेक वाहने वळणाचा अंदाज आल्याने दरीत कोसळले परंतु नशीब बलवत्तर म्हणून ती फक्त जखमी झाली असे यावरून अनेक वळणे आहेत तरी त्वरित संबंधित विभागाने दखल घेत या महामार्गावर दिशादर्शक फलक बसवावेत नसता लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशाराही सुरेश कांबळे यांनी दिला आहे
stay connected