पैशे सुट्टे करायला गेला आणि मालामाल झाला.....?

 पैशे सुट्टे करायला गेला आणि मालामाल झाला.....?



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.१८ केरळ (तिरुअनंतपुरम) येथील अयमानममधील कुदायमपदी येथे राहणाऱ्या पेंटर सदानंदन यांनी ३०० रूपये सुट्टे करण्यासाठी म्हणून लॉटरी खरेदी केली होती. घरामध्ये साहित्य घेऊन येण्यासाठी म्हणून ते बाजारात गेले होते मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी लॉटरी खरेदी केली. केरळातील ६८ वर्षीय पेंटर असणाऱ्या सदानंदन यांचे नशीब काही मिनिटातच चमकले असून त्यांना आता करोडपती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सदानंदन यांनी पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्यांना १२ कोटीची लॉटरी लागली. कोरोना काळात कुटुंबियावर आर्थिक महामारीचे संकट आले असतानाच १२ कोटीच्या लागलेल्या लॉटरीवर त्यांचा आता विश्वास बसत नाही आहे. केरळमधील कुदायमपदी येथे राहणाऱ्या पेंटर सदानंदन यांनी घरामध्ये साहित्य आणण्यासाठी ते बाजारात गेले होतेत. मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी ३०० रूपयांचे लॉटरीचे तिकिट खरेदी केले. लॉटरीचे तिकिट हे त्यांनी लॉटरीचा ड्रॉ काढण्याआधीच काही तासापूर्वी त्यांनी हे तिकिट खरेदी केले होते. त्यानंतर काही वेळातच ते करोडपती बनले आहेत.

सुट्ट्या पैशांच्या शोधात सदानंदन स्वतःकडे सुट्टे पैसे नसल्याने सदानंदन यांनी लॉटरी विक्रेता सेलवनकडून त्यांनी तिकिट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना पाचशे रूपयांचे सुट्टे पैसे मिळणार होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितल की, ‘पैसे सुट्टे करण्यासाठी मी एका दुकानात जात होतो, मात्र दुपारी लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि माझा माझ्या नशीबावर विश्वास बसला नाही.’

सदानंदन सांगतात की, ते पेटिंगच काम करतात पण कोरोनाच्या महामारीने त्यांचे आयुष्य संघर्षमय झाले आहे. त्यांना एक स्वतःचे घर बांधायचे आहे. त्यांना त्यांच्या मुलांचे भविष्य बदलायचे आहे. लॉटरी लागल्यानंतर येणाऱ्या पैशाचे नियोजन त्यांची मुले सनीश आणि संजय यांच्या निर्णयानुसार करायचे आहे.

सदानंदन सांगतात गेल्या कित्येक वर्षापासून ते लॉटरीचे तिकिट खरेदी करत आहेत. या कित्येक वर्षात काही वेळी कधी छोटी मोठी लॉटरी लागली आहे तर कधी काही मिळालेही नाही. मात्र या लॉटरीतील लागलेली ही रक्कम बघून त्यांनी कधी याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. सदानंदन यांना लागलेला हा जॅकपॉट राज्य सरकारच्या क्रिसमस न्यू इयर बंपर लॉटरीतूल लागला आहे. या लॉटरीचे दुसरे बक्षीस ३ कोटीचे तर तिसरे बक्षीस ६० लाखांचे होते.

माध्यमांच्या अहवालानुसार केरळ लॉटरी विभागाने २४ लाख लॉटरी तिकिटे छापली होता. सर्व तिकिटांची विक्री झाल्यानंतर ९ लाख आणि छपाईदरम्यान ८.३४ लाखाची तिकिटे आणखी छापण्यात आली. सदानंदन यांच्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही एका रिक्षा चालकाला १२ कोटीची लॉटरी लागली होती.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected