मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२१ ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी २३ जानेवारी २०२२ रोजी १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. घेत आहे. ठाणे आणि दिवा धिम्या मार्गांवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेच्या पायाभूत सुविधांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक रविवारी मध्य रात्री १ वाजून २० मिनिटांपासून ते रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यत असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉकसह अप जलद मार्गावर २ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक, ठाणे-दिवा दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गांशी संबंधित पूर्वीच्या अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यासाठी घेण्यात येणार आहे. शनिवार/रविवार मध्यरात्री १.२० वाजलेपासून ते रविवारी दुपारी ३.२० वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा आणि रविवार दुपारी १२.३० वाजल्यापासून दुपारी २.३० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर २ तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील. ब्लॉक सुरु होण्यापूर्वी दादर येथून शनिवारी रात्री ११.४० वाजलेपासून ते रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुटणार्या जलद उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.
stay connected