मुंबईसह इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका मार्च महिन्यात...
....निवडणूक आयोग
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२१ मुंबई : मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम येत्या मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणचे केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील जवळपास १४ महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका मार्च महिन्यात जाहीर करण्याबाबत निवडणूक आयोग विचार करत असल्याची चर्चा आहे. मुंबईसोबत पुणे, औरंगाबाद, नाशिक या काही राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या महापालिकांच्याही निवडणुका पार पडू शकतात. कोरोना काळात निवडणुका पार पाडताना काय काय काळजी घ्यायची याबाबतही निवडणू आयोगाने आगोदरच स्पष्टता केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका प्रभागरचनेबाबतही आता स्पष्टता आली आहे. आगोदरच्या संख्येत काही नव्या प्रभागांची भर पडल्याने मुंबईतील एकूण प्रभागसंख्याही बरीच वाढली आहे. सुरुवातीला मुंबईतली प्रभागांची संख्या २२७ इतकी होती. आता त्यात वाढ होऊन ती २३६ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या वाढविण्यावरुन काहीसा वादही पाहायला मिळाला. मात्र, मुंबईतील इमारतींची संख्या वाढल्याने सहाजिकच लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रभाग संख्याही वाढल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पण त्यासोबतच ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. त्यामुळे मुंबईकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्याचेही लक्ष असते. सहाजिकच असे आर्थिक राजधानीचे ठिकाण असलेल्या शहरावर आपली सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतात. मात्र, सुरुवातीला मुंबईवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आता मुंबई महापालिकेवर शिवसेना पक्षाची सत्ता आहे. पाठीमागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकताना दिसतो आहे. या वेळी काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
stay connected