*पोलीस ठाणे आष्टी तर्फे सर्व नागरिकांना आव्हान*

 *पोलीस ठाणे आष्टी तर्फे सर्व नागरिकांना आव्हान*

 पोलीस ठाणे आष्टी तर्फे सर्व नागरिकांना  सूचित करण्यात येते की, सध्याच्या काळात चोरी व घरफोडीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असल्याने  आपण आपल्याकडील सर्व मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने तसेच रोख रक्कम स्वतःच्या जवळ न ठेवता बँकेत सुरक्षित ठेवावी ,

       तसेच सध्या गावात व शेतात वस्तीवर  राहणारे शेतकरी ज्वारी व रब्बीचे पिके काढण्यासाठी घराला लॉक लावून शेतात जातात त्यामुळे दिवसाही चोऱ्या होतात, म्हणून पिके काढण्यासाठी घरातील सर्व व्यक्तीं न  जाता घरातील एक व्यक्ति आपल्या घरी ठेवावी जेणेकरून आपल्या घराचे व मालमत्तेचे रक्षण होईल आणि चोरी व घरफोडीचे प्रकार होणार नाहीत                 

      वरील सूचनांचे पालन करून आपल्या मालमत्तेचे रक्षण करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे *सलीम चाऊस* 

*पोलीस निरीक्षक* 

*पोलीस ठाणे आष्टी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.