सुजित तात्या बागल यांचे पाठपुराव्या मुळे मांगी येथील शेतकऱ्याचा गेली १० वर्षे बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत चालू.
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
मांगी येथील शेतकरी श्री अभिमान किसन अवचर यांचे मांगी गावालगत कॅनल वरती शेती आहे व ते राहायला पण तिथेच आहेत , २०१०साली त्यांनी लाईट मिळावी यासाठी रीतसर कोटेंशन भरले होते व वीज वितरण कंपनी करमाळा येथील ऑफिस ला तसे निवेदन ही दिले होते ,मात्र काही तांत्रिक अडचणी सांगत हे काम रखडवले. वेळोवेळी वायरमन याना तक्रार देऊन ही दुर्लक्ष करण्यात येत होते .
त्यामुळे त्यांनी ही बाब मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुजित तात्या बागल यांचे कडे दाद मागितली ,सुजित तात्या यांनी तात्काळ दखल घेऊन आ.संजयमामा शिंदे यांचेकडे या कामाविषयी मागणी केली आ. संजयमामा यांचे पी. ए डॉ.विकास वीर यांनी
ताबडतोप वीज वितरण कंपनी अधिकारी यांना फोन करून या कामाविषयी पाठपुरावा करून , ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावण्याचे विंनती केली . वीज वितरण अधिकारी ,जाधव साहेब ,व पवार साहेब यांनी पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्याचे सांगितले .
त्यामुळे गेली १० वर्ष अंधारात असणारे शेतकरी श्री अवचर याना लाईट मिळाली ,त्यावेळी त्यांचे कुटुंबियांसह
दमदार आमदार श्री संजयमामा शिंदे व श्री सुजित तात्या बागल यांचे आभार मानले ,या कामी लाईनमंन संभाजी अंधारे ,व जोशी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले .
stay connected