आणी कोरोणावर आखेर उपचार झाला ....
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
दि. २४ जुलाई २०२०रोजी सुश्रुत हाॅस्पीटल डाॅ आंधारे यांच्याकडे दाखल झालो आणी २ आॅगस्ट रोजी तीन दिवसाचे काॅरंटाईन पत्र देत सोडले .
दि ५ आॅगस्ट हा माझा वाढदिवस माझ्यासाठी मुक्ती दिवस ठरला तो कधीच विसरू शकत नाहि कुर्डुवाडीतील वैघकिय उपस्थित. सेवाचा मागोवा व स्थिती मुळे पुन्हा तो प्रसंग आठवला आणी अंगावर शाहरे उभारले
दि १७ जुलाई रोजी कफ झाला होता तीन दिवस औषधे घेतली पण कमी होत नव्हुता म्हणून दि २३ रोजी आकलुज येथे जावून स्कॅन मशिनवर स्कॅन केले तर कोरोणा सदुष्य आजार झाला हे स्पष्ट झाल, लोक कोरोना पाॅझिटीव्ह व्यक्तीला भुता सारखे घाबरत असत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप झाला
कुर्डुवाडीत त्या दिवशी स्कॅन ची व्यवस्था नव्हुती कोरोना झालेला व्यक्ती म्हणजे एक तर आकलुज किंवा बार्शीत जावे लागे आकलुज येथे तबल सहा तास वेटिंग नंतर माझे मशिनवर स्कॅन झाले होते.
कुर्डुवाडी येथे येई पर्यंत रिपोर्ट समजला नाहि कुर्डुवाडीत आल्या नंतर मला कोरोना टेस्ट करायची होती खाजगी लॅबला हि व्यवस्था नव्हुती त्या दिवशी सरकारी दावाखान्यातील किट संपले होते, बार्शी, सोलापूर येथे दावाखण्यात जागा नव्हुती. कुर्डुवाडी येथे कोरोना केअर होते पण तिथे लक्षण आसणरास तेव्हां दाखल करुन घेतले जात नव्हुते . एक लाॅजवर रुम बुक करुन राहण्याचा प्रयत्न केला पण ती हि मिळाली नाहि.
औषध उपचार कसा करायचा हा यक्ष प्रश्न माझ्या समोर होता आतिशय प्रयत्नाने सुश्रुत ,बार्शी येथे पोहचलो पण तिथे हि जागा नाहि तीन तास वेटींग राहिलो बार्शीतील पाहुण्यांचे प्रयत्नाने मला सुश्रुत ला जागा मिळाली डाॅ आंधारे यांचे ट्रिटमेंट घेवून रोग बरा झाला परंतु कुर्डुवाडी मध्ये कोरोना रुग्णा साठी खाजगी व शासकीय दावाखाना नव्हुता, टेस्ट साठी लॅब नव्हुते, ना स्कॅन साठी मशिन, कोरोना पाॅझिटीव्ह रिपोर्ट आल्या नंतर उपचारासाठी हि झगडावे लागले नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास झाला, घर सिल केले गेले या स्थितीत. मन खंबीर मी प्रसंगाला सामोरे गेलो बरा झालो पण आज खाजगी रूग्णालय ,लॅब आहेत पण आजुनहि शासकीय अद्यावत केंद्र नाहि खरी रुग्णसेवा म्हणून सुरु केलेल्या या सर्व डाॅक्टर व स्टाफचे आभारच मी या मनोगतातून मानत आहे .
stay connected