‘‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’’ याचा अर्थ असा की, सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत.जीवाची पर्वा न करता,
आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी,जनसेवेसाठी वाहून देणारे पोलिस बंधू.
कोरोना काळात यांच्या कर्तव्य दक्षेतेचा अनुभव सगळ्यांनाच आला आहे.या पोलिस बांधवांचा आमच्या #सेवासंकल्प_हॅपीगृप_नागपूर या संस्थेच्या वतीने वंदनीय तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला.तसेच या कर्तव्यतत्पर रक्षकांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ अंजली देशमुख घंटेवार,गीता शिंदे, मिनाक्षी सुखदेव, पुष्पा चौरे, सुनिता चिमणकर, सुनिता कांबळे,आशा बर्गे आदी सदस्य उपस्थित होते.
stay connected