भगवान महाविद्यालयाच्या कु.माधुरी भोसले हिची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
आष्टी (प्रतिनिधी):
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या भगवान महाविद्यालयातील बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिकणारी कु.माधुरी संतोष भोसले या गुणवान कुस्तीपटूची 65 किलो वजनी गटामधून अखिल भारतीय खेल महासंघाने नेपाळ येथे संपन्न होणाऱ्या कुस्तीच्या 'आंतरराष्ट्रीय E चॅम्पियनशिप' साठी नुकतीच निवड केली आहे. या स्पर्धा ०७ व ०८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये नेपाळमधील पोखरा येथे खेळवल्या जाणार आहेत.
माधुरीच्या या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य डॉ.भागिनाथ बांगर, डॉ.ज्ञानदेव वैद्य, क्रीडा विभागप्रमुख डॉ.सुर्यकांत धोंडे, डॉ.बापू तोरडमल, डॉ.दीपक टेकाडे, डॉ.आप्पासाहेब टाळके, प्रा.शिवाजी पवार, प्रा.राजू पाचे, पप्पू गोरे व महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
stay connected